Strait of Hormuz संकटाचा सामना करण्यासाठी फ्रान्स आणि दक्षिण कोरिया एकत्र; ट्रम्प यांच्यासमोर उभे केले मोठे आव्हान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
France South Korea Seoul Summit 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाच्या (us-israel iran war) ठिणगीने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना, आता जागतिक राजकारणात एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची युती समोर आली आहे. इराणने ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz)वर मिळवलेले नियंत्रण आणि त्यामुळे निर्माण झालेला जागतिक ऊर्जा तुटवडा या पार्श्वभूमीवर फ्रान्स आणि दक्षिण कोरियाने एकजूट दाखवली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात सेऊलमध्ये झालेली शिखर परिषद ही केवळ एक भेट नसून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन वर्चस्वाच्या धोरणासमोर उभे केलेले एक मोठे आव्हान मानले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा न दिल्याबद्दल दक्षिण कोरिया आणि फ्रान्सवर कडक शब्दांत टीका केली होती. ट्रम्प यांच्या मते, ज्या देशांना तेलाची गरज आहे, त्यांनी स्वतःच हा मार्ग सुरक्षित करावा. या टीकेदरम्यान ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात ४५,००० अमेरिकी सैनिक तैनात असल्याचे सांगितले, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की तिथे केवळ २८,००० सैनिक आहेत. ट्रम्प यांच्या या दिशाभूल करणाऱ्या विधानांनी दक्षिण कोरियामध्ये अस्वस्थता निर्माण केली होती, ज्याचे पडसाद या शिखर परिषदेत उमटले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक
२०१७ नंतर प्रथमच दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करणे ही एक ‘अवास्तव’ (Unrealistic) कल्पना आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादाची प्रक्रिया निश्चित करून हे संकट सोडवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. दक्षिण कोरियाने देखील इराणला कोणतेही ‘ट्रान्झिट फी’ (पारगमन शुल्क) देण्यास नकार देत आपल्या स्वाभिमानी भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे.
South Korea, France to upgrade ties as Macron trip overshadowed by Middle East crisis https://t.co/29UiZGQYL0 https://t.co/29UiZGQYL0 — Reuters World (@ReutersWorld) April 3, 2026
credit – social media and Twitter
या संकटाने दक्षिण कोरियाला एक मोठी शिकवण दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी कबूल केले की, या युद्धामुळे दक्षिण कोरियाचे जीवाश्म इंधनावरील (Fossil Fuel) अति-अवलंबित्व उघड झाले आहे. यावर उपाय म्हणून फ्रान्स आणि दक्षिण कोरियाने अणुइंधन पुरवठा साखळी आणि सागरी पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे करार केले आहेत. हे दोन्ही देश आता नवीकरणीय ऊर्जेकडे वेगाने वळत असून, भविष्यातील ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: इराणच्या ‘ऑईल ट्रॅप’मध्ये अडकली अमेरिका! होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून युद्धात नवा ट्विस्ट; गुप्तचर अहवालामुळे खळबळ
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील तेलाच्या वाहतुकीची सर्वात महत्त्वाची नस आहे. जर हा मार्ग बंद राहिला, तर पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतील. अशा वेळी ट्रम्प यांनी हात झटकले असताना मॅक्रॉन आणि ली यांनी घेतलेली पुढाकार जगाला दिलासा देणारा आहे. तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील या करारांमुळे आशिया आणि युरोपमधील आर्थिक संबंधांना एक नवी दिशा मिळणार आहे. ही शिखर परिषद म्हणजे अमेरिकेच्या धोरणांवर अवलंबून न राहता स्वतःचे हितसंबंध कसे जपायचे, याचा एक उत्तम नमुना ठरली आहे.
Ans: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली यांची भेट सेऊलमध्ये झाली. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आणि ऊर्जा सहकार्यासाठी ही भेट झाली.
Ans: ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात ४५,००० अमेरिकी सैनिक असल्याचा दावा केला, तर प्रत्यक्षात तिथे केवळ २८,००० सैनिक आहेत.
Ans: मॅक्रॉन यांच्या मते, हा मार्ग लष्करी कारवाईने नव्हे, तर राजनैतिक प्रक्रियेने आणि आंतरराष्ट्रीय संवादानेच खुला केला पाहिजे.






