Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

Donald Trump : भारतात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक थेट होत नसतानाही, ट्रम्प यांनी ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत १२५ दशलक्ष मते मिळाल्याचा दावा करत भारताच्या नावाचा वापर केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 05, 2026 | 03:21 PM
Trump mistakes Brazil for India Brazil Presidential Election 2026

Trump mistakes Brazil for India Brazil Presidential Election 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची गमतीशीर चूक
  • ब्राझील निवडणुकीतील रंजक वळण
  • सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

जागतिक राजकारणात आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आणि सोशल मीडियावरील वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा एका मोठ्या चुकीमुळे जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनले आहेत. अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेवर आणि मतमोजणीच्या विलंबावर टीका करण्याच्या नादात त्यांनी दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलऐवजी थेट भारताचे नाव घेतले. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला की, “भारताच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत तब्बल १२५ दशलक्ष लोकांनी मतदान केले आणि निकालही त्याच दिवशी जाहीर झाले”.

प्रत्यक्षात ट्रम्प यांना ब्राझीलमधील चालू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीवर भाष्य करायचे होते. ब्राझीलमध्ये रविवारी पार पडलेल्या पहिल्या फेरीत सुमारे १२५ दशलक्ष मतदारांनी आपला हक्क बजावला होता. परंतु ट्रम्प यांनी घाईघाईत ब्राझील ऐवजी भारताचा उल्लेख केला. विशेष म्हणजे, भारतात अमेरिकेसारखी किंवा ब्राझीलसारखी जनतेद्वारे थेट राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. भारतातील राष्ट्रपतींची निवड ही संसद सदस्य आणि आमदारांद्वारे (लोकप्रतिनिधींकडून) अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. ही मूलभूत माहिती न ठेवता ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे जगभरात त्यांच्यावर हास्यास्पद टीका होत आहे.

अमेरिकन निवडणूक यंत्रणेवर टीका करताना घसरली जीभ

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले होते, “आज भारताच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत १२५ दशलक्ष लोकांनी मतदान केले आणि मतदान संपताच त्याच दिवशी निकालही हाती आले. परंतु अमेरिकेतील डेट्रॉइट, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया आणि इतर राज्यांमध्ये कमी मतदान असूनही निकाल यायला अनेक आठवडे लागतात. मतमोजणीत विलंब करणे म्हणजे फेरफार करणे होय. अमेरिकेतील मतदान पद्धती अत्यंत भ्रष्ट आहे”. व्हाइट हाऊसच्या अधिकृत रॅपिड रिस्पॉन्स खात्यानेही ही पोस्ट पुन्हा शेअर केल्याने ट्रम्प यांच्या या घोडचुकीला अधिकच हवा मिळाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

त्यानंतर लगेचच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्रम्प यांची ही चूक निदर्शनास आणून दिली. युझर्सनी ट्रम्प यांना ट्रान्सग्राफिक्स आणि मिम्सच्या माध्यमातून ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी लिहिले की, “ट्रम्प यांना पुरेशी झोप मिळत नसावी किंवा ते वेगळ्याच विश्वात जगत आहेत”, तर काही भारतीय युझर्सनी त्यांना आठवण करून दिली की भारत हा एक संसदीय लोकशाही असलेला देश असून तिथे प्रत्यक्ष राष्ट्रपती निवडणूक होत नाही.

ब्राझीलच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या मित्राच्या मुलाची मुसंडी

ट्रम्प यांच्या या विधानामागे ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. ब्राझीलमध्ये सध्या उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे सुपुत्र फ्लाविओ बोल्सोनारो हे शर्यतीत आहेत. जायर बोल्सोनारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. लष्करी उठावाद्वारे मागील निवडणुकीचे निकाल उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बोल्सोनारो हे २७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. ट्रम्प यांनी अनेकदा या कारवाईवरून विद्यमान ब्राझिलियन सरकारवर टीका केली होती.

रविवारच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीत फ्लाविओ बोल्सोनारो यांनी धक्कादायक कामगिरी केली आहे. ९८.८१ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली असताना बोल्सोनारो यांना ४७.२४ टक्के मते मिळाली, तर विद्यमान डाव्या विचारांचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना ४४.९१ टक्के मते मिळाली. दोघांपैकी कोणालाही ५० टक्क्यांचा जादुई आकडा गाठता आला नसल्याने आता २५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील (Runoff) अंतिम मतदान होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

लुला दा सिल्वा यांच्यापुढील आव्हाने

विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासाठी हा निकाल एका मोठ्या धक्का मानला जात आहे, कारण मतदानापूर्वीच्या अंदाजांमध्ये लुला सहज जिंकतील असे वाटत होते. मात्र, बोल्सोनारो यांच्या मुलाला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आता २५ ऑक्टोबरच्या अंतिम लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लुला आता इतर लहान पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून देशात पुन्हा एकदा उजव्या विचारसरणीची सत्ता येण्यापासून रोखता येईल. ट्रम्प यांनी आपल्या मित्राच्या मुलाच्या या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठीच ती पोस्ट लिहिली होती, पण देशाच्या नावातील गोंधळामुळे बातमीचे केंद्रस्थान बदलून गेले.

Web Title: Donald trump confuses brazil presidential election with india truth social post hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Brazil
  • Donald Trump
  • India news
  • World news

संबंधित बातम्या

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
1

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
2

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
3

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
4

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.