Donald Trump Dismmises aboout Health rumors
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेत असतात. सध्या ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्याच्या सुरुवातीपासून त्यांच्या कडक परराष्ट्र धोरणांवरुन चर्चेत आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जगाला शत्रू बनवले आहे. अगदी मित्र देश भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळेही त्यांना भारतीयांकडून तीरस्कार मिळत आहे.
गेल्या आठवड्यात त्यांच्या आजारी असल्याच्या आणि मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरलेल्या होत्या. शिवाय डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने, त्यांचे कोणतेही विधान, निर्णय समोर न आल्याने या फवांना अधिक बळ मिळाले होते. आता मात्र त्यांनी या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. ट्रम्प यांनी ते पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना भेटीचा खास नजराणा; भारताला S-400 ची मिळणार आणखी एक खेप
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते कामगार दिनादिवशी वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी व्हर्जिनिया येथे गोल्फ कोर्सला गेले होते. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील अफवा फेक आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की,” या सर्व फेक न्यूज आहे, मी गेल्या आठवड्यात पूर्णपमे ॲक्टिव होतो’ असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प हे ७९ वर्षाचे आहेत. अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प गेल्या काही दिवसांत मीडियासमोर आले नव्हते. त्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती.
उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना विचारण्यात आले होते की, ते कमांडर इन चीफ होणार का? यावर उत्तर देताना व्हान्स यांनी ट्रम्प ही जबाबदारी चांगल्या प्रकारे संभाळू शकतात. पण राष्ट्राध्यक्षांना काही झाले तर मी हे कार्य स्वीकारण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण जगभर मोठी खळबळ उडाली होती.
याच वेळी सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीब्ददल विविध कर्क लावले जात होते. तसेच व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन यांनी देखील ट्रम्प यांच्या पायाला सुज आल्याचे आणि हातावर जखमा झाल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांच्या हातावर निळा डाग असलेला एक फोटो देखील सर्वत्र व्हायरल होत होता.
शिवाय यामध्ये अमेरिकन लोकप्रिय कार्टून शो ‘द सिम्पसन’ ने देखील त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवून आगीत घी ओतण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर ट्रम्प बेपत्ता झाले, ट्रम्प डेड, असे हॅशटॅग ट्रेंड होत होते. मात्र ट्रम्प यांनी या सर्व अफवा असल्याचे आणि माध्यमांमुळे खोट्या गोष्टी पसरवल्याचे म्हटले आहेत. ट्रम्प यांनी ते पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट केले आहे.