पाक पंतप्रधानांचा जागतिक स्तरावर पुन्हा अपमान; शाहबाज शरीफ यांच्या 'त्या' स्थितीवर अध्यक्ष पुतिन यांनाही फुटले हसू, पहा Video (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif)यांचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. यामुळे सर्वत्र त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यांच्या स्थितीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin)यांनाही हसू फुटले आहे. चीनमध्ये आयोजित झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत शहबाज यांची अशी परिस्थिती झाली होती की, ज्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
घडले असे की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शांघाय परिषदेनंतर बैठक झाली. दरम्यान या बैठकीत त्यांची परिस्थितती अस्वस्थ झाली होता. यामागाचे कारण म्हणजे बैठीदरम्यान कानात इअरफोन लावताना शहबाज यांचा गोंधळ उडाला होता. यावेळी पुतिन यांनाही त्यांच्या या परिस्थितीवर हसू आवरले नाही.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. शिवाय या वेळी अध्यक्ष पुतिन शहबाज यांना इअरफोन कसे लावायचे हे शिकवतानाही दिसले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, शहबाज यांच्या हातून इअरफोन सारखा पडत आहे.
यापूर्वी देखील अशा घटना शहबाज शरीफ यांच्यासोबत घडल्या आहेत. २०२२ मध्येही इअरफोन लावतानाची त्यांची अस्वस्थता पाहायला मिळाली होती. यावेळी देखील रशियाचे अध्यक्ष पुतिनसोबत होते. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीत ही घटना घडली होती.
Awkward moment at SCO Summit! Pak PM Shehbaz Sharif fumbles with headphones, dropping them during talks with Putin in Samarkand. Putin laughs as Sharif calls for help.
#ShehbazSharif #Pakistan pic.twitter.com/8VcYbcXPgc— Tannu Chaudhary🇮🇳 (@tannuch19064198) September 3, 2025
याशिवाय पंतप्रधान शहबाज यांची चीनच्या SCO परिषदेदरम्यान देखील हस्तांदोलन करताना गोंधळले होते. यावरुन देखील शहबाज यांना ट्रोल करण्यात आले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी शहबाज पुतिनशी हस्तांदोलन करण्यासाठी वेगाने धावत जात असल्याचे जात असल्याचे दिसून आहे. यावेळी पुतिन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करत होते.
तसेच या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना दुर्लक्षत केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध अधिक ताणले गेले आहेत. जागितक स्तरावर अनेक वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज यांची खिल्ली उडवली गेली आहे.
पाकिस्तानच्या क्वेटा शहरात आत्मघातकी हल्ला; बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीला लक्ष्य, १४ जण ठार