Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये CNNच्या महिला रिपोर्टरवर संताप व्यक्त केला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारल्यानंतर ट्रम्प यांनी रिपोर्टरला वारंवार ‘गप्प बस’ असे म्हणत ‘फेक न्यूज’ आणि ‘फेक रिपोर्टर’ अशी टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 12:53 PM
‘तू फेक रिपोर्टर आहेस...’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

‘तू फेक रिपोर्टर आहेस...’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

Follow Us
Follow Us:
  • पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले
  • किम जोंग उनशी काय संबंध?
  • ‘चुप रहो’ म्हणत CNNवर निशाणा
Donald Trump News Marathi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा पत्रकारावर संतापल्याने चर्चेत आले आहेत. ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान CNNच्या महिला रिपोर्टरने उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी ट्रम्प यांच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला. यावर ट्रम्प चांगलेच संतापले आणि त्यांनी रिपोर्टरला वारंवार ‘गप्प बस’ असे सुनावले.

किम जोंग उनवरील प्रश्नाने ट्रम्प संतापले

१६ वर्षीय लाइफगार्ड रायडर विल्यम्स याच्या सन्मानार्थ व्हाइट हाऊसमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक लाटांमध्ये एका १० वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल विल्यम्सचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात CNNच्या रिपोर्टर क्रिस्टन होम्स यांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारले. सुरुवातीला त्यांनी ट्रम्प यांच्या कार्यकारी सहाय्यकाशी संबंधित प्रश्न विचारला. त्यानंतर उत्तर कोरियाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !

ट्रम्प किम जोंग उन यांच्यासोबतच्या संबंधांबाबत बोलत असताना होम्स यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावांमध्ये कपात करण्याची मागणी किम यांनी केली होती का? असा सवाल केला. प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी रिपोर्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला.

‘चुप रहो’ म्हणत CNNवर निशाणा

ट्रम्प यांनी रिपोर्टरला, ‘गप्प बस’ असे सांगत तिच्यावर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. रिपोर्टरने प्रश्न विचारणे सुरूच ठेवल्यानंतर ट्रम्प यांनी तिच्या माध्यम संस्थेचे नाव विचारले. CNNचे नाव समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा ‘फेक न्यूज’ असा आरोप केला. तसेच रिपोर्टरला ‘फेक रिपोर्टर’ म्हणत तिच्यावर टीका केली.

किम जोंग उनसोबतचे संबंध चांगले असल्याचा ट्रम्प यांचा दावा

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्याशी आपले संबंध चांगले असल्याचे सांगितले. किम यांनी नेहमीच आपल्याशी आदराने वागणूक दिली असून, ‘मी त्यांना समजतो आणि ते मला समजतात’, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, किम यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांमुळे कोरियन द्वीपकल्प अधिक सुरक्षित करण्यास मदत झाली आहे.

दक्षिण कोरियासोबतच्या लष्करी सरावांवरही प्रश्न

याआधी ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबत होणाऱ्या संयुक्त लष्करी सरावांमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली होती. हे लष्करी सराव खर्चिक असल्याचे सांगत अमेरिकेवर त्याचा मोठा आर्थिक भार पडत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. या निर्णयामागे किम जोंग उन यांच्याशी असलेले चांगले संबंध हेही एक कारण असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प आणि किम यांची यापूर्वीही भेट

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. जून २०१९ मध्ये ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या सीमाभागातील पानमुनजोम येथे किम यांची भेट घेतली होती. उत्तर कोरियाच्या भूमीवर पाऊल ठेवणारे ते पहिले विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले होते. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे अमेरिका-उत्तर कोरिया संबंध, दक्षिण कोरियासोबतचे लष्करी सहकार्य आणि पत्रकारांशी ट्रम्प यांचा आक्रमक संवाद पुन्हा चर्चेत आला आहे.

Tupac Murder Trial : 30 वर्षांनी टुपॅक हत्या प्रकरणाचा खटला सुरू!

Web Title: Donald trump lashes out at cnn reporter kim jong un question us south korea military drills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US
  • World news

संबंधित बातम्या

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
1

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
2

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
3

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
4

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.