Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित केले आहेत. इराणशी सुरू असलेल्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 06:08 PM
Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; इराणला दिलासा

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; इराणला दिलासा

Follow Us
Follow Us:
  • Iran युद्धात Donal Trump यांची मोठी घोषणा!
  • हल्ले थांबवण्याचे दिले आदेश
  • जागतिक ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार?
Donald Trump major statement on Iran war: मध्यपूर्वेतील (Middle East) पेटलेला वणवा विझवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धानंतर, ट्रम्प यांनी इराणवरील सर्व लष्करी हल्ले पुढील 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा केली जाणार असून, या चर्चेच्या निष्कर्षावर पुढील रणनीती अवलंबून असेल.

‘ट्रुथ सोशल’वरून दिली माहिती: शांततेसाठी सकारात्मक पाऊल

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत उत्पादक आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. मध्यपूर्वेतील शत्रुत्व कायमचे संपवण्यासाठी आम्ही एक सर्वसमावेशक तोडगा शोधत आहोत. या संवादाचा सकारात्मक कल पाहता, मी युद्ध विभागाला इराणचे पॉवर प्लॅन्ट्स आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.” ही चर्चा संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असून, इराणसोबतच्या बैठकीतील यश लक्षात घेऊन हा ‘युद्धविराम’ पुढे वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

US President Donald Trump posts on Truth Social, “…I have instructed the Department of War to postpone any and all military strikes against Iranian power plants and energy infrastructure for a five day period, subject to the success of the ongoing meetings and discussions” pic.twitter.com/N3Bavc4ylv — ANI (@ANI) March 23, 2026

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?

24 दिवसांचा संघर्ष आणि जागतिक ऊर्जा संकट

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते सैय्यद अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले होते. या घटनेनंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रतिहल्ले सुरू केले. २४ दिवसांच्या या युद्धात इराणने मध्यपूर्वेतील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केल्यामुळे संपूर्ण जगात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले होते. कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला होता.

संवादातून तोडगा काढण्याचे ट्रम्प यांचे संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इराणच्या प्रतिनिधींशी झालेल्या प्राथमिक चर्चेतून चांगले संकेत मिळाले आहेत. अमेरिकेचा मुख्य उद्देश आता लष्करी कारवाईऐवजी वाटाघाटीद्वारे तणाव कमी करणे हा आहे. “पुढील सात दिवस इराणसोबत संवाद सुरू राहील. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर मध्यपूर्वेतील युद्धाची तीव्रता कमी होऊन जगाला महागाई आणि ऊर्जा टंचाईतून दिलासा मिळू शकतो,” असे ट्रम्प यांनी सूचित केले आहे.

White House: अमेरिकेत शटडाउनने उडाली धांदल; ट्रम्प म्हटले, ‘इराणची डोकेदुखी संपल्यावर, देशातील ‘या’ शत्रूला ठेचणार’

Web Title: Donald trump major statement on iran war world news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.