Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump News: अमेरिका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर…; अण्वस्त्रांची चाचणी करण्याचे ट्रम्प यांचे सैन्याला आदेश

जर अमेरिकेने पुन्हा चाचण्या सुरू केल्या तर त्यामुळे नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते,असा  IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) ने इशारा दिला आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 01, 2025 | 12:31 PM
Donald Trump News:

Donald Trump News:

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचे पेंटागॉनला  अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे आदेश
  • रशिया आणि चीनसोबत वाढत्या जागतिक तणावात वाढ
  • ट्रम्प अण्वस्त्रांना खेळणी समजत असल्याची टीका

Donald Trump News: अमेरिका आणि रशियामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तणाव वाढत चालला आहे. या सगळ्यात अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रालयाला, पेंटागॉनला तात्काळ अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. “ट्रुथ सोशल” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला रशिया आणि चीनच्या बरोबरीने अण्वस्त्र चाचण्या करण्याची आवश्यकता आहे.’असे म्हटले आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

“इतर देशांच्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर, मी युद्ध विभागाला ताबडतोब स्वतःची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेने शेवटची २३ सप्टेंबर १९९२ रोजी नेवाडा येथे अण्वस्त्र चाचणी घेतली होती, पण त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी भूमिगत अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचणीसंदर्भात दिलेल्या आदेशांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचे कारण म्हणजे एक दिवस आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.

दरम्यान, रशियानेदेखील अलीकडेच आपल्या अण्वस्त्रांची चाचणी केली होती. रशिया आणि चीनसोबत वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय़ घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान ट्रम्प यांनी, अमेरिकेकडे जगात सर्वाधिक अण्वस्त्रे असल्याचा दावा आहे. परंतु इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबोलिश न्यूक्लियर वेपन्स (ICAN) नुसार, रशियाकडे अंदाजे 5,500 अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिकेकडे अंदाजे 5,044 असल्याची माहिती आहे.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र हल्ल्याची तयारी करण्यासाठी सराव करण्याचे आदेश दिले. रशियन सैन्याने यार्स आणि सिनेवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBMs), तसेच Tu-95 बॉम्बरमधून लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ट्रम्प यांनी या चाचण्यांना उत्तर देताना म्हटले की पुतिन यांनी क्षेपणास्त्र चाचण्यांवर नव्हे तर युद्ध संपवण्यावर लक्ष केंद्रित करावे.

त्यानंतर ट्रम्प यांच्याही अण्वस्त्र चाचणी आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. हे पाऊल जागतिक निःशस्त्रीकरण प्रयत्नांना कमजोर करू शकते आणि १९९२ मध्ये अमेरिकेने स्वाक्षरी केलेल्या अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे (NPT) उल्लंघन मानले जाऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

जर अमेरिकेने पुन्हा चाचण्या सुरू केल्या तर त्यामुळे नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते,असा  IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) ने इशारा दिला आहे.  तर “ट्रम्प अण्वस्त्रांना खेळणी समजत असल्याची टीका अमेरिकन सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी केली आहे. अमेरिकेचे हे पाऊल रशिया आणि चीनच्या वाढत्या अण्वस्त्र प्रभावाला प्रतिसाद म्हणून आहे, परंतु यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेला मोठा धक्का बसू शकतो. असेही बोलले जात आहे.

Web Title: Donald trump news trump orders military to test nuclear weapons why is donald trump afraid of russia china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • Russia

संबंधित बातम्या

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप
1

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या
2

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या

डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं
3

डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं

Police Officer Without Pant Video: पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे
4

Police Officer Without Pant Video: पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.