घणसोलीच्या रस्त्यांची वाईट अवस्था
मोहननगरमधील काँक्रीट रस्त्याचे काम रखडले ; ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
अनेक वर्षांपासून प्रलंबित काम सुरू झाल्याने आनंद आहे. परंतु काम फारच संथ गतीने सुरू आहे. एक वर्ष होत आले तरीही कॉन्ट्रॅक्टरने कामाची गती वाढवली नाही. गटाराचे काम एकूण ३०० मीटरख्या आसपास अजूनही बाकी आहे – मनोज म्हात्रे, सीए रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे गरोदर महिला अथवा वृद्ध व्यक्तींना ने-आण करण्यास भीती वाटते – आकाश म्हात्रे, अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना घणसोली
आयुक्तांकडून तत्काळ कारवाई करण्याची मागणी
नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे त्वरीत दखल घेण्याची आणि कठौर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या निष्क्रिय कंत्राटदाराचा कंत्राट तातडीने काढून घेऊन काळ्या यादीत टाकावे. नवीन आणि योग्य कंत्राटदाराची नेमणूक करावी, जेणेकरून रसयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकाना दिलासा मिळेल. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलावीत, अन्यथा नागरिक तीव्र आदोलन करणार आहेत. प्रमुख समस्या, प्रवाशांचे हाल आणि प्रशासकीय उदासीनता दिसून येतेय
काय आहेत प्रमुख समस्या






