Donald Trump Now Threatens To Impose 'Tariffs On The Entire World'
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणक्या विधानावरुन चर्चेत येत आहेत. NBC वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. यामुळे जागतिक पातळीवर मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, “येत्या काही काळात आम्ही सर्व देशांवर कर लादणार आहोत.”
सद्या अमेरिकेने अमेरिकन वस्तु आणि सेवांवर जास्त आयात शुल्क लागू करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादला होता. यामध्ये भारतासह कॅनडा आणि चीनचा समावेश आहे. पंरतु पुन्हा एकदा त्यांच्या संपूर्ण जगावर कर लादण्याच्या विचाराने सर्वांना गोंधळात पाडले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,”इतिहासात कोणत्याही देशाने असे कधीच केले नसेल. आम्हाला अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात फसवले असून आम्ही देखील त्यांच्याशी त्याचप्रमाणे वागणार आहोत.”
ट्रम्प यांनी “आम्ही सर्व देशांवर टॅरिफ लागू करु, बघूया काय होते असे म्हटले आहे. यापूर्वी अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, अमेरिका केवळ 10-15 देशांवर कर लादरणार, मात्र ट्रम्प यांनी ही अफवा खंडित केली आहे. ट्रम्प यांच्या मते, कोणतेही विशिष्ट देश वगळले जाणार नाहीत, तर संपूर्ण जगावर कर लादण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने काही विशेष देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता, या देशांना डर्टी 15 म्हणून संबोधले होते. याच दरम्यान अमेरिकेच्या ट्रेझरी सचिवांनी सल्ला दिला की, अनेक देशांनी अमेरिकेवर आर्थिक अन्याय केला आहे, यामुळे ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत स्रव देशांना डर्टी 15 च्या यादीत समाविष्ट केले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक देश अमेरिकेच्या निर्यातीवर अवलंबून आहेत. यामुळे टॅरिफच्या निर्णयाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.अमेरिकेसोबत व्यापर करणाऱ्या अनेक देशांनी याकडे गांभीर्याने पाहिले आहे. यामुळे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की,डोनाल्ड ट्रम्प खरंच संपूर्ण जगावर कर लादतात की, ही केवळ पोकळ धमकी आहे.