
Hafiz Saeed statement on India
व्हिडिओनुसार, दोन महिन्यांपूर्वी एका बैठकीत हाफिज सईदला एका पाकिस्तानी नागरिकाकडून भारताच्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ऑपरेशन सिंदूर 2.0 भारत राबवणार का असे त्याला विचारण्यात आले होते. यावेळी हाफिज सईने भारताच्या धमक्क्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. तसेच भारत आता कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याच्या स्थितीत नसल्याचे आणि धाडस करणार नसल्याचेही सईने म्हटले. दरम्यान या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
या व्हिडिओ पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तान सरकराने लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद तुरुंगात असल्याचा दावा केला आहे. मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून दहशतवादाला पाठिंबा आणि दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे म्हटले आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या धोरणांबाबात चिंता निर्माण झाली आहे.
🚨🚨🚨Intel Report: Saifullah Kasuri, Pahalgam Mastermind & LeT Dpty Chief, said that he was present at a Majlis (meeting) with Amir e Mohtaram (Hafiz Saeed). During the meeting, one of the brothers asked a question, saying that India continues to threaten Pakistan every day and… pic.twitter.com/vtbVFEOXTS — OsintTV 📺 (@OsintTV) December 31, 2025
22 एप्रिल 2025 रोजी भारताच्या जम्म-ूकाश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 निरापराध लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले होते. तसेच भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्डे उद्ध्व्स्त केले होते. यानंतर दोन्ही देशांता तीव्र संघर्ष झाला होता. दरम्यान या हल्ल्याच्या दोन महिन्यांनी पाकिस्तान पुन्हा दहशतवादी तळे उभारण्यात दहशतवाद्यांची मदत करत असल्याचे दावे केले जात आहे. तसेच यामध्ये दहशतवादी संघटना एकत्र येऊन महिला आणि मुलांना दहशतवादाचे शिक्षण देत असल्याचेही म्हटले जात आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे देखील आणखी खळबळ उडाली आहे.
‘भारतात एवढी हिंमत नाही…’ ; LeT च्या दहशतवाद्याने भारताला उघड धमकी देत केलं भडकाऊ भाषण, VIDEO VIRAL
Ans: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, हाफिज सईने भारताकडून कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईची त्यांना भीती नसल्याचा दावा केला आहे. तसेच भारत आता दीर्घकाळ कोणतीही कारवाई करणार नाही असेही हाफिजने म्हटले आहे.
Ans: हाफिज सईदच्या व्हिडिओमुळे पाकिस्तानने हाफिज सईद तुरुंगात असल्याचा केलेल्या दाव्यांवर आणि पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Ans: तज्ज्ञांच्या दाव्यांनुसार, लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी पुन्हा हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच यासाठी महिला आणि मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी अनेक बैठका घेतल्या जात आहे. संभ्यावता मोठ्या हल्ल्याची तयारी लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी करत आहेत.