U.S.-Russia nuclear war:
Russia-America Conflict: रशियात चार दिवसांपूर्वी झालेल्या शक्तीशाली भुकंपातून अद्यापही जग सावरलेले नाही. असे असतानाच आता रशियावर दुसऱ्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या जवळ दोन अणु पाणबुड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. हा निर्णय रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेला दिलेल्या थेट अल्टिमेटमननंतर घेण्यात आला आहे.
मेदवेदेव यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, “प्रत्येक अल्टिमेटम हा अमेरिकेशी युद्धाकडे एक पाऊल आहे. रशिया हा इस्रायल किंवा इराणसारखा देश नाही, जो अशा गोष्टी शांतपणे सहन करेल.” त्यांनी ट्रम्प यांना ‘झोपेत असलेल्या जो’ (जो बायडेन) सारखे वागू नये, असेही म्हटले होते. या वक्तव्यावर ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले, “मेदवेदेव यांनी त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे. त्यांना अजूनही वाटते की ते राष्ट्रपती आहेत, परंतु ते धोकादायक मार्गावर चालले आहेत.” त्यांनी रशिया आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भूमिकेबद्दलही निराशा व्यक्त केली. “जर उत्तर स्पष्ट असेल तर आजच निर्णय घ्यावा. आणखी विलंब नको,” असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या भूमिका अधिक आक्रमक बनवल्याचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दिलेल्या १० दिवसांच्या अल्टिमेटमनंतर जागतिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी ५० दिवसांची मुदत जाहीर केली होती, परंतु ती आता घटवून अवघ्या १० दिवसांवर आणली गेली आहे. या पार्श्वभूमीवर रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी कडक आणि इशारावजा टिप्पणी करत अमेरिकेला ‘डेड हँड’च्या परिणामांची आठवण करून दिली आहे.
रशियाच्या सीमेजवळ दोन अणु पाणबुड्या तैनात करण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशामुळे क्रेमलिनने या घडामोडीकडे गंभीरतेने पाहिले आहे. मेदवेदेव यांची टिप्पणी याच पार्श्वभूमीवर समोर आली असून, दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाचे प्रतिबिंब यातून स्पष्ट होते.
या घटना आणि परस्परांच्या उग्र प्रतिक्रिया पाहता, तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे. जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी ही परिस्थिती १९६२ मधील क्यूबन क्षेपणास्त्र संकटाशी तुलना केली आहे. विश्लेषकांच्या मते, सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर असून, कोणतीही चुकीची हालचाल संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकते. हा सगळा प्रकार केवळ धोरणात्मक दबाव आहे की खरोखरच जग एका भयानक युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.