
Donald Trump on US H-1B Visa
H-1B Visa News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एच-१बी व्हिसाबाबत मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसावरील कठोर भूमिका नरम पडताना दिसत आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत कुशल आणि उत्कृष्ट कामगारांची कमतरता पडत आहे. त्यांच्या या विधानाने एच-१बी व्हिसा प्रणालीत मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले आहे की, अमेरिकेला उत्कृष्ट आणि कुशल कामगारांची गरज असून त्यांच्या देशात याची कमतरता आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, बेरोजगार कामगारांवर अवलंबून राहून उद्योग आणि तंत्रज्ञानाला पुढे नेणे अशक्य आहे. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान की. त्यांनी म्हटले की,
मी सहमत आहे की, अमेरिकन कामगारांसाठी वेतन वाझवले पाहिजे, पण देशात प्रतिभाशाली कामगारांची देखील गरज आहे. यासाठी परदेशातून कामगारांना बोलवावे लागेल. अमेरिकेला केवळ बेरोजगार कामगारांच्या जोरावर पुढे जाता येणार आहे, यासाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे.
सप्टेंबरमध्ये ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमांत मोठे बदल केले होते. ट्रम्प यांनी व्हिसावरील शुल्क १ लाख अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवले होते. तसेच या व्हिसातील लॉटरी सिस्टम देखील रद्द केली होती. हा नियम नवीन अर्जदारांसाठी लागू होणार होता. हा निर्णय अमेरिकेतील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आला होता.
ट्रम्प सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक मोठ्या आयटी कंपन्या परदेशी लोकांना अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत कमी पगारावर कामावर ठेवतात. यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. परंतु ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरुन आता एच-१बी व्हिसाच्या धोरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या ट्रम्प व्हिसा धोरणात काय बदल करतील याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान अमेरिकेत तज्ज्ञ लोक नसल्याचे मान्य केले.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत वाढ केली होती.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांची एच-१बी व्हिसावरील कठोर भूमिका नरम पडताना दिसत आहे.