US H1-B Visa : ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट, जाणून घ्या नव अपडेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US H1B Visa Rules : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी १९ सप्टेंबर रोजी या व्हिसाच्या शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ केली होती. हा नियम २१ सप्टेंबर पासून लागू झाला आहे. नुकतेच या व्हिसाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. यानुसार काही अर्जदारांना मोठी सूट मिळणार आहे.
H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका
अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने (DHS) एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
याच वेळी अमेरिकेची व्यावसायिक संघटना यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने देखील यावर स्पष्टीकर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नव्या शुल्काविरोधात ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल करण्यात आला आहे. या संघटनेच्या मते, एवढे मोठे शुल्क अमेरिकन कंपन्यांसाठी अन्यायकारक आहे. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढेल, तसेच परदेशी कुशल कामगारांची भरती कमी होईल. यामुळे ट्रम्प यांचा आदेश हा कायदेशीररित्या चुकीचा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या मते, ट्रम्प यांच्या निर्णयाचा फायदा अमेरिकेच्या आर्थिक प्रतिस्पर्धींना होत आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयानंतर व्हाइट हाउसने एक निवदेन जारी केले होते. यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, हे शुल्क केवळ नव्या एच-१बी व्हिसा अर्जदारांसाठी लागू होणार आहे. हा निर्णय अमेरिकेतील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आला होता. ट्रम्प प्रशासनाच्या मते, अनेक मोठ्या आयटी कंपन्या परदेशी लोकांना अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत कमी पगारावर कामावर ठेवत आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाही. पण H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे कंपन्या परदेशी लोकांना घेणे टाळतील आणि देशातील तरुणांना संधी देतील असे युक्तीवाद आहे.
प्रश्न १. ट्रम्प प्रशासनाचा एच-१बी व्हिसा शुल्क वाढीचा आदेश कधीपासून लागू झाला आहे?
ट्रम्प प्रशासनाचा एच-१बी व्हिसा शुल्क वाढीचा आदेश १९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. हा २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला असून आजही आमंलात आहे.
प्रश्न २. एच-१बी व्हिसा नियमांत कोणते नवे बदल करण्यात आले आहेत?
एच-१बी व्हिसा शुल्कात काही अर्जदारांना सूट देण्यात आली आहे.
प्रश्न ३. ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात का वाढ केली?
ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ करण्यामागे देशात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि या व्हिसाचा गैरवापर रोखणे असा हेतू आहे.