
Donald Trump to Visit China after call with XI Jinping
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या सोमवारी (२४ नोव्हेंबर) फोनवरुन चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन, फेंटानिल आणि सोयाबिन, तैवान, व्यापार यांसारख्या मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेवेळी जिनपिंग यांनी ट्रम्पला चीन दौऱ्याचे आमंत्रण दिले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे अमेरिकेत स्वागत असल्याचे म्हटले. जिनपिंग पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची ऑक्टोबरमध्ये भेट झाली होती. दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात दोन्ही नेते समोरासमोर आले होते. बुसान (Busan) विमानतळावर १०० मिनिटांसाठी त्यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी टॅरिफवर चर्चा केली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ कमी केले होते. यामध्ये त्यांनी चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवरील एकूण सरासरी टॅरिफ ५७% वरून ४७% पर्यंत कमी करण्यात आला होता.
शी जिनपिंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी म्हटले की, चीनशी अमेरिकेचे खूप चांगले संबंध आहेत. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, तैवान आणि युक्रेनवर चर्चा झाली.ट्रम्प यांनी तैवानची भूमी चीनला परत करणे हा दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरचा सर्वात मोठा मुद्दा आहे. परंतु चीनने तैवान मुद्दावर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. तैवान हा चीनचा भाग असल्याचा दावा गेल्या अनेक काळापासून बीजिंग करत आहे.
चीन आणि तैवान (Taiwan) यांच्यातील संबंध नेहमी तणावपूर्ण राहिले आहेत. चीन तैवानला आपला भाग मानतो, परंतु तैवान हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे, असा तैवानचा दावा आहे. तैवानवर वर्चस्व मिळवून चीन पश्चिम प्रशांत महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन-तैवानवरुन नेहमीच चिंतेचे वातावरण असते. चीनने अनेक वेळा तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. पण तैवानने अमेरिकेच्या मध्यस्थीने हा प्रयत्न धुडकावून लावला आहे. अमेरिका सुरुवातीपासूनच तैवानच्या बाजून आहे. परंतु सध्या अमेरिकेच्या धोरणात बदल होताना दिसत आहे.