Donald Trump's final ultimatum to Hamas to Release all Israeli hostages
वॉशिंग्टन: सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करार सुरु आहे. या युद्धविराम कराराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सध्या दुसऱ्या टप्प्यावर चर्चा सुरु आहे. मात्र हमासने काही अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हमासाला सर्व इस्त्रायली ओलिसींना सोडण्याच्या अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी इस्त्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेतन्याहू यांनीही हमासला धमकी दिली होती.
शेवटची चेतावणी
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इस्त्रायली बंधकांना सोडण्याचा शेवटचा इशारा दिला असून त्यांनी म्हटले आहे की, हमासने बंधकांना सोडले नाहीतर, ते उद्ध्वस्त होतील. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर यासंबंधित पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये हमास नेत्यांना अल्टिमेटम देत म्हटले की, तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे केले नाही तर, हमासच्या सर्व सदस्यांचा खात्मा करण्यात येईल. ही तुमची शेवटची चेतावणी आहे. तुमच्याकडे अजूनही गाझातून बाहेर पडण्याची संधी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – गाझात पुन्हा एकदा विनाशाचे वादळ; इस्त्रायलचा भयानक हल्ला
आणकी काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये Shalom Hamas (नमस्कार आणि निरोप) तुम्ही निवडा. सर्व ओलिसांना आणि ज्या लोकंना मारेल त्यांचे मृतदेह परत करा नाहीतर तुमची काहाणी संपली. फक्त आजारी आणि मानसिक रुग्णच मृतदेह ठेवतात आणि तुम्ही लोक आजारी आणि वेडे आहात.
तसेच त्यांनी गाझातील लोकांना उद्देशून तुमचे उज्वल भविष्य तुमी वाट पाहत आहे असे म्हटले आहे. मात्र, ओलिसींना सोडण्यात आले नाहीतर, भविष्य चांगले मिळमार नाही, तुमचा मृत्यू निश्चित आहे, हुशारीने निर्णय घ्या असेही ट्रम्प यांनी म्हटले.
नेतन्याहूंनीही दिला होता इशार
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही हमासला ओलिसींच्या सुटकेचा इशारा दिला होता. तसेच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनू देखील उर्वरित ओलिसींना सोडण्याचा इशार दिला होता. नेतन्याहूंनी म्हटले होते की, सर्वांना सोडण्यात आले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही की तुमच्यासोबत काय घडेल. यावेळी हमास नष्ट होईपर्यंक युद्ध होईल.
इस्त्रायलचा गाझावर हल्ला
सध्या गाझात पुन्हा एकदा विनाशाचे वादळ उभे राहिले आहे. इस्त्रायलने गाझावर पुन्हा एकदा 03 मार्च रोजी हल्ला केला आहे. हमासने युद्धंबदीच्या दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिल्याने इस्त्रायलने हे हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्ध करार तोडण्याची घोषणा केली असून गाझावर चारी बाजून हल्ला केला आहे. एवढेच नव्हे तर गाझाला मिळमारी मानवतावादी मदतही इस्त्रायलने बंदी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचा रमजानच्या काळात ‘हा’ मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ