Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गद्दारांना माफी नाही! एकच चूक अन् ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्याला गमवावी लागली खुर्ची; नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक खळबळजनक निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन प्रशासनात अनेक मोठे बदल केले आहे. आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 01, 2025 | 10:34 PM
Donald Trump’s national security adviser Mike Waltz to leave post says US media reports

Donald Trump’s national security adviser Mike Waltz to leave post says US media reports

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक खळबळजनक निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन प्रशासनात अनेक मोठे बदल केले आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनातील एका व्यक्तीला काडून टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्टज आणि त्यांचे प्रमुख डिप्टी अ‍ॅलेक्स वोंग या दोघांना काढून टाकले आहे.

इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अधिकारी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईची गुप्त माहिती लिक झाली होती. ही माहिती लिक केल्याचा आरोप  मायकेल वॉल्टज आणि त्यांचे प्रमुख डिप्टी अ‍ॅलेक्स वोंग  या दोन्ही अधिकाऱ्यांवर आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आमचे तुमच्यावर लक्ष आहे…’ ; अमेरिकेचा पुन्हा एकदा इराणला कडक शब्दात इशारा

ती एक चूक अन्…

मायकेल वॉल्टज फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच्या पदी निवड करण्यात आली. पण अलीकडेचे त्यांनी अटलांटिक मासिकाचे संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना व्हाईट हाईच्या एका गुप्त ग्रुपमध्ये चुकून सामील केले. या ग्रुपमध्ये येमेन आणि हुथी बंडखोरांविरोधात अमेरिकन रणनीती आखली जात होती. ही माहिती लिक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. ही एकच चूक वॉल्टज यांनी भारी पडली. यामुळे वॉल्टज यांच्यावर टीकांचा भडिमार झाला.

या प्रकरणानंतर प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चूकीला ऑपरेशनल सिक्युरिटीचा भंग म्हटले. अनेकांनी वॉल्टड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतील झालेली ही चूक अत्यंत घातक ठरली. यामुळे ट्रम्प यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्न उपस्थित झाले.

विश्वासू सहकाऱ्याला देखील केले बरखास्त

डिप्टी ॲलेक्स वोंग यांनाही पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. बोंग हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळापासून त्यांचे विश्वासू सहाकारी होते. वोंग यांची इंडो-पॅसिफिक धोरण आणि अमेरिकेच्या जागतिक संबंधांमध्ये महत्वाची भूमिका होती. यामुळे त्यांचा राजीनामा व्हाईट हाऊससाठी मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.दरम्यान व्हाईट हाऊसकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प प्रशासन सध्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या नियुक्तवर लक्ष देत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निर्णायक मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: अमेरिकेचा भारताला पाठिंबा; पाकिस्तानमध्ये खळबळ, आता काय करणार शाहबाज शरीफ?

Web Title: Donald trumps national security adviser mike waltz to leave post says us media reports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 10:34 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
4

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.