Pahalgam Terror Attack: अमेरिकेचा भारताला पाठिंबा; पाकिस्तानमध्ये खळबळ, आता काय करणार शाहबाज शरीफ? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतात संतापची उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पाळीवर देखील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या कुरापती चालून ठेवल्या आहेत. भारत-पाक सीमेवर गोळीबार करुन सतत भारताला आव्हान देत आहे. तर भारताचे लष्करीही पाकिस्तानला तडाखेबाज उत्तर देत आहे.
या वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने भारताच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. यामुळे पाकिस्तानची चिंता अधिकच वाढली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात युद्धासाठी लष्करी साधनांची मदत पुरवली आहे. यामुळे भारताची सागरी ताकद अधिक बळकट झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारताला इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) आणि त्यासंबंधित लष्करी उपकरणे दिली आहे. ही लष्करी उपकरणे सुमारे 131 दशलक्ष डॉलर्सच्या किमतींची आहेत. या करारामुळे भारताची समुदातील सुरक्षा आणि उपस्थिती वाढेल. तसेच सध्याच्या भारत आणि पाकमधील तणाव पाहता भविष्यातील संभाव्य धोके हातळण्यास भारताला मदत होईल. तसेच भारताने अमेरिकेकडून सी-विजन सॉफ्टेवअर, तांत्रिक मदत प्रशिक्षण, सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स आणि विविध उपकरणांची खऱेदी केली आहे.
इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस ही योजना भारताच्या हिंद-प्रशांत महासागरातील टापू, दक्षिण-पूर्व आशिया आणि हिंद महासारग क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 2022 मध्ये टोकियोमध्ये झालेल्या क्वाड शिखर परिषदेमध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. या परिषदेत भारत, चीन, अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होता. या योजनेचे उद्दिष्ट डार्क शिपिंगवर काम करणाऱ्या जहाजांवर (गुप्त पद्धतीने काम करणाऱ्या ) लक्ष्य ठेवणे, तसेच भागीदार देशांना त्यांच्या सागरी हद्दींचे निरीक्षण करण्यास मदत करणे आहे.
अमेरिकेकडून दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जागाचे लक्ष भारत पाकिस्तानकडे लागलेले आहे. याच दरम्यान अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेपण करत दोन्ही देशांना शांततेने चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या खोनवरुन संवाद साधला. दरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. जयशंकर यांच्याशी बोलताना रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. रुबियो यांनी म्हटले की, अमेरिका दहशतवाद विरोधातील लढाईत भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचे थैमान; देशात आणीबाणी लागू