'आमचे तुमच्यावर लक्ष आहे...' ; अमेरिकेचा पुन्हा एकदा इराणला कडक शब्दात इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर आहे. याच दरम्यान दुसऱ्या बाजूला अमेरिकेची येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधात कारवाई सुरुच आहे. तर दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमध्ये सध्या ओमानच्या मध्यस्थीने चर्चा करत आहे. इराणच्या अणु कार्यक्रमांबाबत ही चर्चा सुरु असून पुन्हा एकदा अमेरिकेने इराणला कडक शब्दाक इशार दिला आहे. अमेरिकेने इराणला येमेनच्या हुथी बंडखोरांना पाठिंबा दिल्याबद्दल सुनावले आहे. इराणला यासाठी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हा इशार दिला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संबंधी एक जुने वक्तव्य रिट्विट केले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते की, हुथींच्या कोणत्याही हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरण्यात येईल.
https://t.co/DKl55mmFaT pic.twitter.com/vsVttencfH
— Pete Hegseth (@PeteHegseth) May 1, 2025
पीट हेगसेथ यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही हुथी बंडखोरांना पाठिंबा देत आहात हे आम्ही पाहत आहोत. तुम्ही काय करत आहात याच्यावर आमचे लक्ष आहेच. तसेच अमेरिकन सैन्य काय करु शकते हेही तुम्हाला वेगळं सागण्याची गरज नाही. तुम्हाला इशार देण्यात आला होता. आता तुम्ही निवडलेल्या वेळी आणि ठिकाणी तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.” अशा कडक शब्दात पीट हेगसेथ यांनी इराणला इशारा दिला आहे.
सध्या अमेरिकेने येमेनच्या हुथीबंडखोरांविरोधात लष्करी हल्ले तीव्र केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेमे बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या हजारहून अधिक ठिकाणांवर कारवाई केली आहे. तर दुसरीकडे हुथी बंडखोरांमी पॅलेस्टिनींशी संबंधित जहाजांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत.
इराणने अमेरिकेचे आरोप फेयाळून लावले असून हुथी बंडखोरांन पाठिंबा देत असल्यास नकार दिला आहे. इराणने म्हटले आहे की, हुथी बंडखोर स्वतंत्रपण काम करत आहेत. परंतु अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराण हुथी सैनिकांना लष्करी आणि धोरणात्मक मदत पुरवत आहे.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष ढाल्यानंतर 15 मार्च रोजी येमेनच्या बंडखोरांविरोधात कारवाईचे आदेश दिले. अमेरिकेन सैन्याने हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि लाहने मुले देखील होती. या हल्ल्यावर बोलताना ट्रम्प यांनी म्हटले होते की, हुथी दहशतवाद्यांनो तुमचा वेळ संपला आहे. अमेरिका तुम्हाला पूर्णत: नष्ट करेल. त्यानंतर अमेरिकेचे हुथी बंडखोरांवरली हल्ला सुरुच आहेत. आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक हुथी जखमी आहेत.
हुथी बंडखोर हा येमेनमधील शिया अल्पसंख्याकांचा एक सशस्त्र गट आहे, जो 1990 च्या दशकात तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी स्थापन झाला होता.