Donald Trump's action Searches begin in gurdwaras for illegal immigrants
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेताच अनेक कडक आदेशांवर कारवाई सुरु केली. त्यापैकी प्रमुख म्हणजे अमेरिकेतील अवैध स्थलांतरण रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. शपथ घेतल्यानंतर 6 दिवसांत 1500 हून अधिक स्थलांतरितांना ट्रम्प यांनी देशातून हद्दपार केले आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आता बेकायदेशीर स्थलांतरितांच्या शोध गुरुद्वारांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.
शीख संघटनांमध्ये संतापाची लाट
अमेरिकी गृह मंत्रालय (DHS) च्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील गुरुद्वारांमध्ये तपासणी केली आहे. यामुळे शीख संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संघटनांनी या कारवाईला आपली धार्मिक आस्थेची पवित्रता धोक्यात आणणारी ठरवले आहे. शीख फुटीरतावादी तसेच अवैध स्थलांतरित न्यू यॉर्क आणि न्यू जर्सीमधील काही गुरुद्वारांचा वापर करत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
गुन्हेगारांना पकडण्यास मदत
ट्रम्प यानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेताच काही तासांतच अनेक कठोर आदेश जारी केले आणि गृह मंत्रालयाचे मंत्री बेंजामिन हफमॅन यांनी एक निर्देश जारी केला आहे. या आदेशात पूर्व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने लागू केलेली मार्गदर्शक तत्वे रद्द केली आहे. यामध्ये गुरुद्वारे, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांचा समावेश असून गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “ही कारवाई CBP आणि ICE अधिकाऱ्येना कायद्याचे पालन करण्यासाठी सक्षम बनवते आणि अपराधी, हत्यारे, आणि इतर गुन्हेगारांना पकडण्यास मदत करते.त्यांनी सांगितले की, आता गुन्हेगारांना अटक डाळण्यासाठी अमेरिकेच्या शाळेत किंवा चर्चमध्ये, गुरुद्वारांमध्ये लपता येणार नाही. ट्रम्प आपल्या धाडसी अधिकाऱ्यांचे हात बाधमार नाहीत आणि त्यांच्या विविकबुद्धीचा वापर करतील.
शीख संघटनेकडून चिंता व्यक्त
शीख अमेरिकन लीगल डिफेन्स एंड एज्युकेशन फंड (SALDEF) ने ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करत चिंता व्यक्त केली आहे. यासंबंधित एक निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, “या बदलामुळे गुरुद्वारे आणि इतर पूजा स्थळांना लक्ष्य करण्याचा धोका वाढला आहे.”
SALDFच्या संचालक किरण कौर गिल यांनी गुरुद्वारे केवळ पूजा स्थळ नाहीत, तर ते शीख समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि धार्मिक केंद्र असल्याचे म्हटले आहे. त्यांना कारवाईचे लक्ष्य बनवणे धार्मिक आस्थेच्या पवित्रतेला धोक्यात आणते आणि देशाती स्थलांतरित समुदायांसाठी चिंताजनक संदेश देतो. ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईमुळे अमेरिकेतील शीख समुदाय आणि इतर स्थलांतरित समुदायांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एलॉन मस्क यांच्या राजकीय प्रभावाने बिल गेट्स आश्चर्यचकित; म्हणाले…