
Donald Trump's tariff bomb Will benefit America
Donald Trump Tarrif News : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे टॅरिफ धोरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केले आहे. पण याच वेळी ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रेसिप्रोकल टॅरिफ मध्य रात्री लागू केल्यामुळे अमेरिकेला याचा अब्जावधींचा फायदा होईल. त्यांच्या या पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मध्य रात्र झाली आहे! आता अब्जावधीं डॉलर्सचे टॅरिफ देशात येण्यास सुरुवात होईल. अनेक देशांनी अमेरिकेचा वर्षानुवर्षे फायदा घेतला आहे, आता मात्र असे होणार नाही. उलट अमेरिकेत भरपूर पैसा येईल.” त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेला ग्रेट अमेरिका बनवण्यापासून केवळ एकच गोष्ट रोखू शकते ती म्हणजे आपल्याला अपयशी पाहण्याची ठेवणाऱ्या लोकांची इच्छा. परंतु आता त्या लोकांना अमेरिकेच्या टॅरिफचा सामना करावा लागणार आहे.
घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू
ट्रम्प यांनी मध्य रात्री टॅरिफचा बॉम्ब भारतावर फोडला खरं पण, यामुळे खरंच अमेरिका फायदा होईल का? खरंच अमेरिकेमध्ये अब्जावधी पैसे येतील? तर काही अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेमध्ये अब्जो डॉलर्स येतील परंतु याचा परिणाम देशातील व्यावसायांवर होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी भारत, ब्राझीलसह अनेक देशांवर प्रचंड शुल्क लागू केले आहे. पण यामुळे अमेरिकेच्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना याची किंमत मोजावी लागणार आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, अमेरिकाच्या मते यामुळे अब्ज डॉलर्सची बचत होईल. पण तज्ज्ञांच्या मते, यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाणात वाढतच आहे आत यामध्ये महागाईची देखील भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे ही गोष्ट कुऱ्हाडीवर पाय ठेवण्यासारखी आहे. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते, याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
( @realDonaldTrump – Truth Social Post )
( Donald J. Trump – Aug 6, 2025, 11:44 PM ET ) RECIPROCAL TARIFFS TAKE EFFECT AT MIDNIGHT TONIGHT! BILLIONS OF DOLLARS, LARGELY FROM COUNTRIES THAT HAVE TAKEN ADVANTAGE OF THE UNITED STATES FOR MANY YEARS, LAUGHING ALL THE WAY, WILL START… pic.twitter.com/0QRX1AxLqp — Fan Donald J. Trump 🇺🇸 TRUTH POSTS (@TruthTrumpPosts) August 7, 2025
ट्रम्प यांनी भारत आणि ब्राझील वर ५०%, लाओस आणि म्यानमारवर ४०% , तर स्वित्झर्लंड वर ३९%, इराक आणि सर्बिया वर ३५% कर लादला आहे. व्हिएतनाम, तैवान, बांगलादेश आणि आणि श्रीलंकेवर ट्रम्प यांनी २०% शुल्क लागू केले आहे, तर दक्षिण कोरिया, युरोपिय युनियन, आणि जपानवर १५% कर, तर सर्वात कमी चीनवर १०% कर लागू केला आहे. कॅनडावर ३५% लादला आहे. तसेच सेमीकंडक्टर कंपन्यांवर १००% कर ट्रम्प यांनी लादला आहे.