घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ghana Helicopter Crash News marathi: घाना : आफ्रिकन देशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आफ्रिकन देश घानामध्ये एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळले आहे. बुधवारी ०६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये घानाचे संरक्षण मंत्री एडवर्ड ओमाने बोमा आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद यांचाही समावेश आहे. घाना सरकारने देशात राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटना स्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढले आहेत. यांची ओळख पटवणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. घानाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (०६ ऑगस्ट) घानाच्या दक्षिणेकडील भागात ही घटना घडली. हेलिकॉप्टर राजधानी अक्रा येथून दक्षिण घानाच्या ओबुआसी शहराकडे रवाना झाले होते.
घानाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी हेलिकॉप्टर Z9 सकाळी राजधानी अक्रा येथून उड्डाण घेतले. मात्र काही वेळानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटलाय त्यानंतर घानाच्या दक्षिणेकडील भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली. या घटनेने संपूर्ण घानामध्ये राजकीय शोक जाहीर करम्यात आला आहे.
चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती?
या भीषण अपघातात घानाचे कार्यवाहक उप-राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अल्हाजी मोहम्मद मुनिरु लिमुना, नॅशन डोमोक्रॅटिक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सारपोंग आणि माजी संसदीय उमेदवार सॅम्युअल अबोआगे यांचाही मृत्यू झाला आहे. तसेच तीन क्रू मेंमबर्सचाही यामध्ये समावेळ होता. या घटनेने संपूर्ण घानामध्ये लोकांमध्ये घबराटीचे वातानरण पसरले आहे. हे लष्कराचे Z9 हेलिकॉप्टर होते. हेलिकॉप्टर कोसळताच भीषण आग लागली आणि हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला.
सध्या या अपघाताचे कारण समोर आलेले नाही. घानाने Z9 विमान हे सामान्य आणि वैद्यकीय वाहतूकीसाठी वापरले जाते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. याच काळात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा, त्यानंतर काही मिनिटांनी संपर्क परतला. परंतु हेलिकॉप्टरचा अपघाता झाला होता. अधिकाऱ्यांच्या मते, खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. सध्या या घटनेची चौकीशी सुरु आहे.