भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan America News : इस्लामाबाद : एकीकडे अमेरिका (America) आणि भारतामध्ये तणाव वाढत आहे, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पाकिस्तानसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी आता भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. परंतु याच वेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेला ट्रम्पच्या भेटीसाठी जात आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेची वाढती जवळीक भारतासाठी कोणत्या तरी मोठ्या धोक्याचे संकेत देत आहे.
दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला आणि भडकाऊ विधाने करणाऱ्या असीम मुनीरशी नेमकी काय चर्चा करणार आहेत ट्रम्प असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे. पाक न्यूज वेबसाइट डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, असीम मुनीर (Asim Munir) आगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वॉशिंग्टन जाण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर असीम मुनीर यांची ही अमेरिकेला दुसरी भेट आहे. जून महिन्यांत त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी ट्रम्प सोबत त्यांच्या खास डिनरचेही आयोजन करण्यात आले होते.
India Vs Trump: मोठी बातमी! ट्रम्पचा धडाका सुरूच; आता भारतावर २५ नव्हे तर ५० टक्के Tariff लावला
पाकिस्तानसाठी (Pakistan) ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंद अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. शिवाय नुकतेच ट्रम्प यांनी भारतावर ५०% अतिरिक्त कर लागू केला आहे, तर पाकिस्तानमध्ये तेलाच्या साठ्याचे केंद्र उभारण्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुनीर यांच्या या भेटील अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
भारत पाकिस्तान युद्धबंदी
शिवाय ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्यात मदत केल्याबद्दल अनेक वेळा पाकिस्तानने ट्रम्पचे आभार मानले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी २० हून अधिक वेळा युद्धबंदीते श्रेय घेतले आहे. एकीकडे पाकिस्तान ट्रम्प चे कौतुक करत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प पाकिस्तानचे. भारताला मात्र ट्रम्प यांनी झिडकारले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, असीम मुनीर अमेरिकेचे आर्मी जनरल आणि युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर मायकेल कुरिला यांच्या निरोप समारंभात सामील होणार आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानने कुरिला यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते. तर कुरिला यांनी पाकिस्तानला दहशतवादविरोधी मदत केल्याबद्दल आभार मानले होते.
गाझामध्ये नरसंहार सुरुच! दर तासाला एका मुलाचा उपासमारीने बळी ; UN चा धक्कादायक अहवाल