Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! 1,700 हून अधिक बाधित, 625 जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव

Ebola Crisis Congo: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) आणि आसपासच्या भागांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव गंभीर पातळीवर पोहोचला असून, १,७९२ लोकांना संसर्ग झाला आहे आणि ६२५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 10, 2026 | 10:58 AM
ebola crisis congo outbreak cases death toll un warning marathi news

ebola crisis congo outbreak cases death toll un warning marathi news

Follow Us
Follow Us:
  • भीषण प्रादुर्भाव
  • संयुक्त राष्ट्रांचा इशारा
  • आव्हानांमध्ये वाढ

Ebola outbreak Democratic Republic of Congo : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि मध्य आफ्रिकेच्या आसपासच्या भागांमध्ये ‘इबोला’ (Ebola Virus) विषाणूच्या प्रादुर्भावाने अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. ताज्या अहवालानुसार, काँगोमध्ये आतापर्यंत तब्बल १,७९२ लोकांना इबोलाचा संसर्ग झाला असून, ६२५ निरपराध लोकांचा यात मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संयुक्त राष्ट्रांनी (UN) आंतरराष्ट्रीय समुदायाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले असून, हा प्रादुर्भाव अत्यंत विनाशकारी वळणावर असल्याचा इशारा दिला आहे.

इतुरी प्रांत बनला केंद्रबिंदू; विषाणूचा वेगाने प्रसार

या भीषण साथीची अधिकृत घोषणा १५ मे रोजी करण्यात आली होती. काँगोमधील इतुरी (Ituri) प्रांत या साथीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, हा विषाणू आता केवळ एका प्रांतापुरता मर्यादित राहिलेला नसून, शेजारील इतर प्रांतांमध्येही वेगाने पाय पसरत आहे. काँगोमधील अंतर्गत संघर्ष, राजकीय अस्थिरता आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे विस्थापन यामुळे या धोकादायक रोगाचा प्रसार रोखणे आरोग्य यंत्रणांसाठी कठीण बनले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे आपत्कालीन मदत समन्वयक टॉम फ्लेचर यांनी सांगितले की,

“इबोलाचा कणा मोडण्यासाठी जगाला आता अत्यंत वेगाने आणि एकत्रितपणे काम करावे लागेल. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट

‘साथीचा सर्वोच्च टप्पा येणे अजून बाकी’ – आरोग्य मंत्री

काँगोचे आरोग्य मंत्री सॅम्युअल रॉजर काम्बा यांनी बुनिया येथे पत्रकारांशी बोलताना या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,

“इबोलाचा हा उद्रेक सध्या अत्यंत सक्रिय टप्प्यात आहे. शहरातील लोकसंख्येची उच्च घनता आणि स्थानिक भौगोलिक घटकांमुळे सामान्य जनतेचे संरक्षण करणे एक मोठे आव्हान बनले आहे. ही महामारी नेमकी कधी शिखरावर (Peak) पोहोचेल, याचा अंदाज लावणे सध्या अत्यंत घाईचे ठरेल.”

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या ७६४ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये किंवा विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, तर २९५ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या आजाराचा एकूण मृत्यूदर ३४.१ टक्के एवढा उच्च असल्याने प्रशासकीय वर्गात खळबळ उडाली आहे.

युगांडापर्यंत पोहोचला संसर्ग; शेजारी देशांमध्ये घबराट

हा प्राणघातक विषाणू केवळ काँगो देशापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेजारील देश युगांडामध्येही इबोलाची २० बाधित प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे पूर्व आणि मध्य आफ्रिकेतील सर्वच देशांच्या सीमांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

केवळ आरोग्य आणीबाणी नाही, तर त्याहून मोठे संकट!

टॉम फ्लेचर यांनी स्पष्ट केले की, हे संकट केवळ एका सार्वजनिक आरोग्य आणीबाणीपुरते मर्यादित राहिलेले नाही. इबोला संकट येण्यापूर्वीच काँगोमधील लाखो नागरिक गरिबी, उपासमार, सशस्त्र संघर्ष आणि विस्थापनाचा सामना करत आहेत. त्यातच येथील कमकुवत पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FIFA: फुटबॉल चाहते संतप्त! फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर लंडनमध्ये उसळला हिंसाचार, पाहा VIRAL VIDEO

आंतरराष्ट्रीय मदतीची तीव्र गरज

संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) काँगो प्रशासनाच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. युएनने बाधित क्षेत्रांमध्ये मानवतावादी कार्यकर्त्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवेश देण्याची मागणी सर्व संबंधित पक्षांकडे केली आहे. तसेच, अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा आणि पुरवठा मार्ग खुले ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी त्वरित निधी उपलब्ध करून न दिल्यास हा उद्रेक जागतिक पातळीवर डोकेदुखी ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Ebola crisis congo outbreak cases death toll un warning marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Ebola
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी
1

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

FIFA: फुटबॉल चाहते संतप्त! फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर लंडनमध्ये उसळला हिंसाचार, पाहा VIRAL VIDEO
2

FIFA: फुटबॉल चाहते संतप्त! फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर लंडनमध्ये उसळला हिंसाचार, पाहा VIRAL VIDEO

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती
3

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

NATO Summit : शस्त्र की राजनैतिक खेळी? पंतप्रधान एर्दोगान यांनी ट्रम्प, मॅक्रॉन आणि स्टारमर भेट म्हणून दिली तुर्की बनावटीची पिस्तू
4

NATO Summit : शस्त्र की राजनैतिक खेळी? पंतप्रधान एर्दोगान यांनी ट्रम्प, मॅक्रॉन आणि स्टारमर भेट म्हणून दिली तुर्की बनावटीची पिस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.