Education in Britain will become more expensive, travel expenses will also increase; Government increases visa fees
लंडन: आता ब्रिटनमध्ये शिक्षण घेणे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अवघड होणार आहे. ब्रिटनने त्यांच्या इमिग्रेशन धोरणांत मोठे बदल केले असून 9 एप्रिलपासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थी आणि कामगार वर्गावर होणार आहे. यामुळे व्हिसा अर्जाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय, भारतीयांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी जायचे असल्यास जास्त पैसै खर्च करावे लागणार आहेत कारण यूक्रेन व्हिसा नियम कडक केले असून शुल्कात वाढ केली आहे.
परदेशातील लोकांसह यूकेमधून वर्क व्हिसा किंवा स्टडी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनाही जास्त पैसे भरावे लागणे आहेत. यामध्ये स्किल्ड वर्कर रुट अंतर्गत अर्ज करणाऱ्यांचाही समावेश आहे. ब्रिटनच्या गृह कार्यालयाने इमिग्रेशन शुल्काची नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, काम, अभ्यास आणि प्रवास अशा वेगवेगळ्या व्हिसा श्रेणींसाठी अर्ज करणाऱ्या परदेशींना जास्त पैसे भरावे लागतील. तसेच ब्रिटनच्या नागरिकत्वासाठीही जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.
शिवाय, परदेशातून एखादा व्यक्ती नोकरीसाठी ब्रिटनमध्ये येत असेल तर कंपन्यांना देखील जास्त खर्च करावा लागणार आहे. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन यादीनुसार, कुशल कामगरा व्हिसासाठी किमान पाउंड £२३,२०० वरून £२५,००० प्रति वर्षापर्यंत भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना स्टडी व्हिसा शुल्क £५२४ पौंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५८०५९ पर्यंत ७ टक्क्यांनी भरावे लागणार आहे.
यूकेच्या प्रवासी व्हिसाच्या शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. येत्या सहा महिन्यांत प्रवासी व्हिसाचे शुल्क पाउंड 127 पर्यंत वाढणार आहे. दोन, पाच आणि दहा वर्षांच्या व्हिजिट व्हिसा देखील महाग होण्याची शक्यता आहे. तसेच थेट एअरसाईड ट्रान्झिट व्हिसला शुल्क पाउंड 39 पर्यंत वाढेल, तर लॅंडसाईड ट्रान्झिट व्हिसा पाउंड 70 पर्यंक वाढेल. यूकेमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसलेल्या नागरिकांसाठी आवश्यक असलेले ETA शुल्क 60 टक्क्यांनी वाढून £16 होईल. या सर्व नवीन नियमांमुळे ब्रिटनमध्ये शिक्षण, नोकरी, आणि प्रवास महागणार आहे. याचा परिणाम भारतीयांसह अनेक देशांवर होण्याची शक्यता आहे.