Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले…

Musk and Trump Friendship : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लोचे सीईओ पुन्हा चर्चेत आले आहेत. दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपर्यंत तणावाचे वातावरण होते. पण आता दोघांची मैत्री पुन्हा ट्रॅकवर दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2025 | 01:32 PM
Elon Musk says 'Thank You' To Trump know why

Elon Musk says 'Thank You' To Trump know why

Follow Us
Close
Follow Us:

 

Trump-Musk news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील तणाव पुन्हा निवळताना दिसत आहे. सध्या दोघे १९ नोव्हेंबर रोजी सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ झालेल्या डिनरमध्ये एकत्र दिसून आले. यानंतर अमेरिकेच्या राजकारणात आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा खळबळ उडली आहे.

अमेरिकन राजकारणात मोठा ट्विस्ट! Trump-Musk मध्ये पुन्हा मैत्री…पण या यु-टर्न मागचं खरं कारण काय?

ट्रम्प यांनी मस्कला म्हटले लकी, का?

पण व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या डिनरमध्ये दोघे एकत्र दिसून आले. यावरुन दोघांमधील मैत्री पुन्हा ट्रॅकवर येताना दिसत आहे.  या डिनर वेळी ट्रम्प यांनी मस्क यांना हसत मजेशीर अंदाजात तीन वेळा हाक मारली. यानंतर त्यांनी म्हटले की, एलॉन तू खूप लकी आहे की मी तुझ्यासोबत आहे! यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांना असेही म्हटले की, यावर तू मला कधी ‘Thank You’ ही म्हटले नाही. ट्रम्प यांच्या या विधानाने डिनरदरम्यान हास्याचा स्फोट झाला होता.

मस्क यांनी मानले ट्रम्पचे आभार

ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांना मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्पचे आभार मानणारी पोस्ट केली. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अमेरिका आणि जगासाठी केलेल्या कामाचे आभार मानतो. यासोबत मस्क यांनी डिनर दरम्यानचा फोटोही शेअर केला आहे.

या डिनरमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग आणि एलॉन मस्क उपस्थित होते. या डिनरदरम्यान ट्रम्प यांनी नव्या टॅक्स बिलावरही चर्चा केली. हे बिल अमेरिकेतील वाहनांसाठी विशेष सवलती देणार आहे.

 

I would like to thank President Trump for all he has done for America and the world pic.twitter.com/KdK9VC2MLs — Elon Musk (@elonmusk) November 19, 2025

ट्रम्प-मस्कमधील हा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यात आहेत. सध्या दोघांची मैत्री पुन्हा ट्रॅकवर येत असल्याचा चर्चांणा उधाण आले आहे. जानेवारी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर मस्क यांना त्यांच्या सरकारमध्ये डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी (DOGE) चे प्रमुख बनवले होते. परंतु दोघांमधील वादामुळे मस्क यांनी राजीनामा दिला.

ट्रम्प-मस्क वाद

एकेकाळी दोघांमध्ये सोशल मीडियावर तीव्र शाब्दिक युद्ध झाले होते. दोघांनी एकमेकांवर हल्ला चढवला होता. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग बन ब्युटीफुल धोरणावर तीव्र टीका केली होती. यामुळे ट्रम्प यांनी एलॉन मस्कला त्यांच्या प्रोजेक्टचा सरकारी निधी बंद करण्याी धमकी दिली होती. तर मस्क यांनी जेफ्री एपस्टिन (Jeffery Epstine) प्रकरणावरुन ट्रम्पवर गंभीर आरोप केले होते.

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना काय म्हटले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झालेल्या डिनरदरम्यान मजेशीर अंदाजात तीन वेळा हाक मारली, त्यांनी म्हटले की, एलॉन तू खूप लकी आहेस की मी तुझ्यासोबत आहे! पण तू याबद्दल मला कधी थॅंक्यू म्हटले आहे का असे म्हटले

  • Que: मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांना मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्पचे आभार मानणारी पोस्ट केली. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अमेरिका आणि जगासाठी केलेल्या कामाचे आभार मानतो.

  • Que: मस्क आणि ट्रम्प यांच्यात का झाल्या होता वाद?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफूल धोरणांवर मस्क यांनी उघडपणे टीका केली होती. ज्यामुळे यामुळे ट्रम्प-मस्कमध्ये वाद झाला होता.

Web Title: Elon musk says thank you to trump know why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा
1

US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा

अमेरिकन राजकारणात मोठा ट्विस्ट! Trump-Musk मध्ये पुन्हा मैत्री…पण या यु-टर्न मागचं खरं कारण काय?
2

अमेरिकन राजकारणात मोठा ट्विस्ट! Trump-Musk मध्ये पुन्हा मैत्री…पण या यु-टर्न मागचं खरं कारण काय?

Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार
3

Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट
4

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.