ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? इलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद सुरु आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. मस्क यांनी एक्सवर पोस्ट करताना म्हटले आहे की, एपस्टिनशी संबंधित गुप्त फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे आणि यामुळेच या फाईल्स सार्वजनिक केल्या जात नाहीत.
मस्क यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आता एक मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प एपस्टिन फाईलमध्ये आहे. यामुळे या फाइल्स अद्याप उघड झालेल्या नाही. त्यांनी पुढे म्हटले आहे की, हे लक्षात ठेवा सत्य कधी ना कधी बाहेर पडतेच.” पण अनेकांना एपस्टिन फाइल नेमक्या काय आहेत असा प्रश्न पडला आहे. आज आपण हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत.
एपस्टिन हा वाद श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी संबंधित आहे. जेफ्री एपस्टिनवर २०१९ मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अमेरिकन-ऑस्ट्रेलियन महिला व्हर्जिनिया लुईस ग्रिफे हिने याबद्दल खुलासा केला होता.
नुकतेच तिचे निधन झाले असून तिने अमेरिकेतील हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. जेफ्री एपस्टिनने तिला या वेश्याव्यवसायात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे २०१९ मध्ये तिने एका मुलाखतीदरम्यान उघड केले होते. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता. तिच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली होती.
नंतर २०२१९ मध्ये एपस्टिनला अटक करण्यात आली. पण त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे घोषित करण्यात आले. २००२ ते २००५ दरम्यान न्ययॉर्क आणि फ्लोरिडातील अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या होता.
या वर्षी एपस्टाईन संबंधित प्रकरणा संबंधी काही फाइल्सचा खुलासा करण्यात आला. यामध्ये अनेक हाय-प्रोफाइल लोकांचा उल्लेख होता. जेप्री एपस्टिन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मित्र मानले जात होता. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव समोर आले होते. ट्रम्प यांच्या एपस्टिनशी असलेल्या संबंधावर तपासही करण्यात आला होता.
दरम्यान एलॉन मस्क यांनी नुकतेच ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ सल्लागार पदाचा आणि सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE)च्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिलावर टीका केली होती. यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद सुरु झाला. तसेच कर विधेयकावरुनही दोघांमध्ये मतभेद सुरु झाले. यानतर दोघांमध्ये एकमेकांवर टीकांचा मारा सुरु झाला. सध्या दोघांच्या वादविवादातूनच हे प्रकरण उघडकीस येत आहे.
Time to drop the really big bomb:@realDonaldTrump is in the Epstein files. That is the real reason they have not been made public.
Have a nice day, DJT!
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
ब्रिटिश राजकुमारावर आरोप करणाऱ्या वर्जिनियाचे निधन: प्रिन्स अँड्र्यूवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप