एलन मस्कचा ट्रम्पच्या विधेयकाला कडाडून विरोध (फोटो सौजन्य - Instagram)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या बजेट बिलावर हल्लाबोल केलाय. त्यांनी एक्स वर याबाबत आपले मत पोस्ट केले आणि हे बिल घृणास्पद असल्याचे म्हटले. एलोन मस्क यांचा वन बिग ब्युटीफुल बिलावर हा मोठा हल्ला आणि विरोध असल्याचे मानण्यात येत आहे.
ट्रम्प प्रशासनातील आपले पद सोडल्यानंतर काही दिवसांनीच मंगळवारी, एलोन मस्क यांनी वन बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावर आणखी एक जोरदार हल्लाबोल केला. यावर एलोन मस्क यांनी टीका केली. मस्क यांनी लिहिले की, “मला माफ करा, मी आता ते सहन करू शकत नाही. हे खूप मोठे, अपमानजनक आहे आणि काँग्रेसचे हे बिल अत्यंत घृणास्पद आहे. ज्यांनी याला मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चूक केली. तुम्हाला माहिती आहे”
एलन मस्कचा कडाडून विरोध
एलोन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधेयकाला सतत विरोध करत आहेत. मस्क यांच्या मते, हे विधेयक बजेट तूट कमी करण्याऐवजी वाढवेल, ज्यामुळे DOGE चे प्रयत्न निष्फळ ठरतील. वन बिग ब्युटीफुल विधेयकात कर कपात १० वर्षांसाठी वाढवण्याचा आणि सीमा सुरक्षा खर्च वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
खरं तर, मस्क यांनी ट्रम्पच्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ विरोधात मोर्चाच उघडला आहे. त्यांनी CBS News या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान या विधेयकावर नाराजी व्यक्त केली. मस्क म्हणाले की ते एकतर मोठे किंवा सुंदर असू शकते, परंतु ते एकाच वेळी दोन्ही असू शकत नाही.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अर्थसंकल्पाला एक मोठे सुंदर विधेयक म्हटले होते, ज्याची मस्कने खिल्ली उडवली. मस्क यांनी लिहिले की, हे एक मोठे, वाईट विधेयक आहे आणि ज्यांनी त्याचे समर्थन केले त्यांना लाज वाटली पाहिजे. यामुळे २.५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थसंकल्पीय तूट आणखी वाढेल आणि अमेरिकन लोकांवर मोठा भार पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले
Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव! काय आहे ‘Gorklon Rust’ चा अर्थ, जाणून घ्या
एलन मस्क यांचे ट्वीट
I’m sorry, but I just can’t stand it anymore.
This massive, outrageous, pork-filled Congressional spending bill is a disgusting abomination.
Shame on those who voted for it: you know you did wrong. You know it.
— Elon Musk (@elonmusk) June 3, 2025
DOGE ची जबाबदारी सोडली
व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना मस्क यांनी ट्रम्पवर थेट हल्ला केला नाही. राष्ट्रपतींनी त्यांना सोन्याची चावीही भेट दिली, परंतु या टीकेनंतर ट्रम्प यांना राग येऊ शकतो. तथापि, रिपब्लिकन नेत्यांनी मस्कविरुद्ध मोर्चा सुरू केलाय. रिपब्लिकन हाऊस स्पीकर माइक जॉन्सन म्हणाले की एलोन मस्क पूर्णपणे चुकीच्या दिशेने आहेत. त्यांना वाटते की यामुळे सरकारी प्रशासन सुधारणा विभाग (DOGE) ला नुकसान होईल, परंतु तसे नाही.
अत्यंत भारी असणारे बजेट
या नवीन विधेयकामुळे पुढील दशकात अमेरिकन सरकारचे $३६.२ ट्रिलियन किंवा $३६ ट्रिलियन कर्ज $३.८ ट्रिलियनने वाढेल. या संघीय अर्थसंकल्पामुळे पुढील एका वर्षात अमेरिकेचे कर्ज $३.१ ट्रिलियनने वाढेल.
ट्रम्प यांनी निवडणुकीत वृद्धांसाठी कर कमी करण्याचे आणि सामाजिक सुरक्षा खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी अशा योजनांसाठी सरकारी खर्च वाढवण्याची गरज त्यांना सांगितली आहे. ट्रम्प म्हणतात की या विधेयकामुळे जनतेवरील कराचा भार कमी होईल. विरोधी डेमोक्रॅट्सनी मस्क यांच्या ट्विटचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. सिनेटर डेमोक्रॅट नेते चक शूमर म्हणाले, हे रिपब्लिकन लोकांसाठी आरसा आहे, ट्रम्प यांनी किमान त्यांच्या मित्राचे ऐकले पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे
डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर ; १.२ ट्रिलियन डॉलर्सचा अमेरिकेचा कतारशी स्वंतत्र करार
जय-वीरूसारखी मैत्री
२०२४ च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एलोन मस्क यांनी ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा दिला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला २५०० कोटी रुपयांची निवडणूक देणगीही दिली.
ट्रम्प यांनी मस्क यांच्या टीकेवर थेट काहीही म्हटले नाही. ते म्हणाले, आम्ही संसदेत या विधेयकावर चर्चा करू. आम्ही काही चिंता दूर करू. ट्रम्प यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांच्या पत्नी केटी मिलर यांनीही ट्रम्प यांचे कार्यालय सोडले आहे आणि एलोन मस्क यांच्या कंपनीत सामील झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांची बदनामी झाली आहे.