Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव! काय आहे 'Gorklon Rust' चा अर्थ, जाणून घ्या
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एक्सचा मालक एलन मस्क आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी नवीन कंपन्यांमुळे तर कधी फॅमिलि ड्रामामुळे, मस्कची सर्वत्र चर्चा असते. मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील खरेदी करत असतो. आता सतत चर्चेत असणारा मस्क आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यावेळी त्याचं चर्चेत असण्याचं कारण जरा वेगळं आहे.
एलन मस्क सतत सोशल मीडिया अकाऊंट एक्सरील त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलत असतो. आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलून ‘गोर्कलॉन रस्ट’ असं ठेवलं आहे. खरं तर हे नाव पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रत्येकजण या नवीन नावाचा अर्थ काय आहे याचा अंदाज लावत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मस्कने तिसऱ्यांदा त्याचे नाव बदलले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यापूर्वी त्याने डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून ‘केकियस मॅक्सिमस’ असं ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2025 रोजी त्याने त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून ‘हॅरी बोल्झ’ असं ठेवलं होतं. यानंतर आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदललं आहे. यावेळी त्याने त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलून गोर्कलॉन रस्ट असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थ काय आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग आता एलन मस्कच्या या नवीन युजरनेमचा अर्थ जाणून घेऊया.
‘Gorklon’ हा शब्द xAI ने तयार केलेला AI चॅटबॉट ‘ग्रोक’ सारखाच आहे. तर ‘klon’ हा ‘clone’ चा संदर्भ असू शकतो, म्हणजेच मस्कने ‘ग्रोकचा क्लोन’ असं त्याचं युजरनेम ठेवलं आहे. दुसरीकडे, ‘रस्ट’ ही एक प्रोग्रामिंग भाषा आहे जी xAI त्यांच्या तंत्रज्ञान स्टॅकमध्ये वापरते. त्यामुळे पूर्ण नाव “ग्रोक क्लोन इन रस्ट” या संभाव्य एआय टेक प्रयोगाकडे निर्देश करू शकते.
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या नवीन नावाचे क्रिप्टो कनेक्शन असण्याची शक्यता आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की मस्कचे नाव बदलणे हे केवळ विनोद नसून एक रणनीती असू शकते. सोलाना ब्लॉकचेनवर ‘गॉर्क’ नावाचा एक मीम कॉइन आधीच अस्तित्वात आहे. कदाचित मस्कला या क्रिप्टोकरन्सीला प्रसिद्धी देऊन त्याचा प्रचार करायचा असेल. अलीकडेच, मस्कने ‘Gork’ नावाच्या हँडलला X वर टॅग केले जे अधिकृत ‘Grok’ अकाउंटपेक्षा वेगळे आहे. हे नवीन हँडल अतिशय मजेदार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ग्रोक’ हा शब्द पहिल्यांदा एलन मस्कने एआय चॅटबॉट लाँच करताना वापरला होता. हा शब्द प्रसिद्ध विज्ञान कथा पुस्तक ‘द हिचहायकर गाइड टू द गॅलेक्सी’ मधून घेतला आहे, ज्याचा अर्थ काहीतरी खोलवर समजून घेणे असा होतो.