Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत पसरतोय भारतीयांविरोधात द्वेष? एलॉन मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे विधान चर्चेत

अमेरिकेत भारतीयांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला आहे. दरम्यान या भारतीयांविरोधातील वाढत्या द्वेषपूर्ण प्रवृत्ती आणि भारतविरोधी वक्तव्यांवर कॅनडियन संगीतकार ग्रिम्स (क्लेअर बाउचर) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2024 | 04:38 PM
अमेरिकेत पसरतोय भारतीयांविरोधात द्वेष? एलॉन मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे विधान चर्चेत

अमेरिकेत पसरतोय भारतीयांविरोधात द्वेष? एलॉन मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे विधान चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेत भारतीयांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला आहे. दरम्यान या भारतीयांविरोधातील वाढत्या द्वेषपूर्ण प्रवृत्ती आणि भारतविरोधी वक्तव्यांवर कॅनडियन संगीतकार ग्रिम्स (क्लेअर बाउचर) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एलॉन मस्क यांच्या माजी सहकारी असलेल्या ग्रिम्स यांनी सोशल मीडियावर भारतीय संस्कृतीचे समर्थन करत, द्वेषाला तोंड देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

ग्रिम्स यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांमुळे भारतीय संस्कृतीशी त्यांचे जवळचे नाते आहे. त्यांचे वडिल रवि सिद्धू हे भारतीय असून त्या भारतीय कुटूंबात बाढल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “ भारतीय संस्कृतीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवले आहे. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीत सामंजस्य साधणे खूप प्रेरणादायी आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- South Korea Plane Crash: जेजू एअरलाइन्सने दक्षिण कोरियातील विमान अपघाताबद्दल मागितली जाहीर माफी

भारतीयांविरोधातील टिप्पणींवर रोष

ग्रिम्स यांनी सोशल मीडियावर भारतविरोधी वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या वांशिक हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. श्रीराम कृष्णन यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अमेरिकेत वाद निर्माण झाला होता. या वादावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी “भारतीयांविरोधातील द्वेष पसरवणे हे लज्जास्पद असून, ते नियोजितरीत्या घडत आहे,” असे ठामपणे सांगितले आहे.

भारतीय कौशल्य आणि संस्कृतीचा गौरव

याशिवाय, ग्रिम्स यांनी भारतीय तांत्रिक कौशल्य आणि संस्कृतीचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. अमेरिकन कंपन्यांनी भारतात अधिक गुंतवणूक करावी, यामुळे रोजगार निर्माण होईल आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे त्यांनी सुचवले. “भारतीय आणि अमेरिकन संस्कृतींच्या सामंजस्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक सकारात्मक बदल होऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.

भारतीय संगीत आणि चित्रपटाचे कौतुक

तसेच, भारतीय संगीताविषयी आपले प्रेम व्यक्त करताना ग्रिम्स यांनी भारतीय गायकांचे आणि त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. “भारतीय गायक हे जगातील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हेही नमूद केले आहे की, अमेरिकेत बॉलिवूडचा प्रभाव अद्याप मर्यादित आहे आणि त्याला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्रिम्स यांची ही प्रतिक्रिया भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित करते. त्यांच्या मतांमुळे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिकांना अधिक पाठिंबा मिळेल आणि द्वेषाला विरोध करण्याची ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत 18.1% ने वाढली बेघर लोकांची संख्या; HUD च्या अहवालातून कारणंही स्पष्ट

Web Title: Elon musks ex girlfriend grimes strong reaction to racism against indians in america nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • elon musk
  • india
  • US
  • World news

संबंधित बातम्या

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
1

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
4

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.