Europe must compete with Russia alone as the U.S. aids Ukraine and bolsters its neighbors' security
अमेरिका नाटोमधून बाहेर पडल्यास युरोपमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोला आर्थिक मदत थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रशियाला संधी मिळून युक्रेननंतर इतर युरोपीय देशांवर आक्रमण करण्याचा धोका वाढला आहे.
अमेरिकेने नाटोपासून माघार घेतल्यास, युरोपला स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी उचलावी लागेल. सध्या नाटोकडे १२,५०० रणगाडे, ३,५०० लढाऊ विमाने आणि ४,२२३ अण्वस्त्रे आहेत. मात्र, अमेरिकेच्या बाहेर पडल्यानंतर नाटोचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात घटेल. अमेरिकेशिवाय नाटोकडे फक्त ७,००० रणगाडे, २,१०० लढाऊ विमाने आणि केवळ ५५५ अण्वस्त्रे राहतील. परिणामी, रशियाला युरोपवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Taliban-Pakistan Conflict : तालिबानचा तोरखाम सीमेवर कब्जा; पाकिस्तानी सैन्याची माघार
अमेरिकेच्या माघारीमुळे रशियाला युक्रेनवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर, बाल्टिक देश – लिथुआनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया तसेच फिनलंड, स्वीडन आणि नॉर्वे हे रशियाच्या टार्गेटवर असतील. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड यांसारख्या देशांनी युक्रेनला लष्करी मदत दिली असल्याने त्यांच्यावरही रशियाचा रोख असेल.
रशियाने सुमारे २४ लाख नवीन सैनिक भरती करण्याची योजना आखली आहे. हे दर्शवते की व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणावर युरोपियन देशांशी युद्ध करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या माघारीमुळे नाटो कमकुवत झाल्यास रशिया थेट आक्रमण करू शकतो. यामुळे युरोपमधील सत्तासंतुलन पूर्णपणे बदलू शकते.
युक्रेनच्या सुरक्षेसाठी युरोपियन युनियन (EU) आणि डेन्मार्कने महत्त्वाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मोल्दोव्हाला संरक्षण यंत्रणा दिली जाणार असून, बाल्टिक देशांमध्ये लढाऊ विमाने आणि नॉर्डिक देशांमध्ये ड्रोन बटालियन तैनात केली जाणार आहे. डेन्मार्कचे पंतप्रधान मॅटी फ्रेडरिकसन यांनी युरोपियन देशांना युक्रेनला त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यातील तणावामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कीवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. झेलेन्स्की यांनी ब्रिटनसोबत खनिज करार केल्याने रशियाला युक्रेनमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी संधी मिळू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऑस्कर ट्रॉफी विकली जाणार कवडीमोल भावात; लाखोंच्या सोन्याच्या ट्रॉफीची विक्री फक्त 87 रुपये
अमेरिका नाटोपासून बाहेर पडल्यास, नाटो देशांना रशियाच्या संभाव्य आक्रमणाला एकटेच तोंड द्यावे लागेल. यामुळे युरोपमध्ये मोठे राजकीय आणि लष्करी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पुतिन आणि ट्रम्प यांनी जर युरोपसाठी गुप्त करार केला तर युरोपमध्ये व्यापक विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे नाटोच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.