Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप

Pakistan Nuclear Scientist Abdul Qadir Khan : अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे माजी ऑपरेशन्स प्रमुख जेम्स लॉलर यांनी एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे ज्यामुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 24, 2025 | 12:32 PM
Pakistan Nuclear Scientist Abdul Qadir Khan

Pakistan Nuclear Scientist Abdul Qadir Khan

Follow Us
Close
Follow Us:
  • सीआयएचे माजी ऑपरेशन्स प्रमुख जेम्स लॉलर यांनी उघड केले: अब्दुल कादीर खान गुपचूप इतर देशांना अणु तंत्रज्ञान विकत होते.
  • मुशर्रफ संतापले: पुरावे मिळाल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी खान यांना घरगुती नजरकैदेत ठेवले.
  • ‘मृत्यूचे व्यापारी’ टोपणनाव: लॉलर यांनी सांगितले की खान यांनी संवेदनशील तंत्रज्ञान इराण, लिबिया आणि इतर देशांना पुरवले.

Pakistan Nuclear Scientist Abdul Qadir Khan : पाकिस्तानच्या (Pakistan) अणुशास्त्र आणि सुरक्षाव्यवस्थेबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा खुलासा समोर आला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे (CIA) माजी ऑपरेशन्स प्रमुख जेम्स लॉलर यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये तणाव आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लॉलर यांनी असा दावा केला की पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉ. अब्दुल कादीर खान हे अनेक वर्षे गुप्तपणे अणु तंत्रज्ञान आणि ब्लूप्रिंट्स विकत होते. यामुळे पाकिस्तानचा अणु कार्यक्रम पूर्णपणे धोक्यात गेला होता.

सीआयएला कळल्यावर पाकिस्तान हादरला

लॉलर यांच्या मते, सीआयएचे संचालक जॉर्ज टेनेट यांनी स्वतः पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडे ठोस पुरावे सादर केले. दस्तऐवज, नेटवर्क कॉल रेकॉर्ड्स आणि व्यवहारामधील पुरावे पाहिल्यानंतर मुशर्रफ संतप्त झाले आणि त्यांनी खान यांना थेट शिवीगाळ केल्याचा दावा लॉलर यांनी केला. यानंतर खान यांना 2004 मध्ये घरगुती नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांनी नंतर दोष मान्य केला, परंतु पाकिस्तानातील काही राजकीय नेत्यांनीदेखील या व्यवहारांना साथ दिली असल्याचा दावा केला.

एक्यू खान संवेदनशील गुपिते विकत होते

असा आरोप करण्यात आला होता की खान अणु तंत्रज्ञानाशी संबंधित संवेदनशील माहिती लिबियासारख्या देशांना विकत होते. अब्दुल कादीर खान यांचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे, ज्यात अणु तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि बेकायदेशीर नेटवर्क चालवणे या आरोपांचा समावेश आहे. यामुळे २००४ मध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नंतर त्यांनी नेटवर्कमधील आपली भूमिका मान्य केली, परंतु मुशर्रफ आणि बेनझीर भुट्टो यांच्यावरही आरोप केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग

 कोणत्या देशांना विकली गुपिते?

लॉलर यांच्या खुलास्यानुसार, खानच्या नेटवर्कचे धागेदोरे अनेक देशांपर्यंत पसरले होते, जिथे अणु तंत्रज्ञानाची मागणी वाढत होती.

या यादीत प्रामुख्याने:

  • इराण
  • लिबिया
  • उत्तर कोरिया

यांचा समावेश आहे. सीआयएच्या तपासात हेही उघड झाले की इराणच्या अणु कार्यक्रमात P1 आणि P2 सेंट्रीफ्यूज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, जे थेट खान नेटवर्ककडून मिळाले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

“M erchant of Death” : हे टोपणनाव का?

लॉलर यांनी सांगितले की हा शब्द त्यांनी प्रथम वापरला कारण:

“जे तंत्रज्ञान लाखो लोकांचा जीव घेऊ शकते, ते विकणारा माणूस व्यापारी नसून मृत्यूचा दलाल असतो.”

या नेटवर्कमुळे मध्य पूर्वेत अणुशस्त्रधारी शर्यतीची भीती वाढली आहे.

 जागतिक धोका वाढला?

लॉलर यांनी चेतावणी दिली की,

“जर इराण पूर्णपणे अणुशक्ती बनला, तर मध्यपूर्वेत अणुशस्त्रांचा साथी रोग पसरू शकतो.”

हा इशारा पुन्हा एकदा जागतिक सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या अणु नेटवर्कची धोकादायक छाया दाखवतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अब्दुल कादीर खान कोण होते?

    Ans: पाकिस्तानचे प्रमुख अणुवैज्ञानिक आणि अणु तंत्रज्ञान निर्माते.

  • Que: त्यांच्यावर आरोप काय आहेत?

    Ans: गुप्तपणे अणु तंत्रज्ञान इतर देशांना विकल्याचा आरोप.

  • Que: त्यांच्यावर कारवाई झाली का?

    Ans: होय, 2004 मध्ये त्यांना घरगुती नजरकैदेत ठेवण्यात आले.

Web Title: Ex cia chiefs nuclear leak claim sparks panic in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • America
  • International Political news
  • pakistan

संबंधित बातम्या

Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग
1

Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग

IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण
2

IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
3

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?
4

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.