Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी पुन्हा VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Modi Meloni meeting : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या G-20 शिखर परिषदेत (G20 Johannesburg) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांची भेट पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी उबदार हस्तांदोलन आणि स्मितहास्याने संवादाची सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांत मोदी आणि मेलोनी यांच्यात घडणाऱ्या भेटींच्या मालिकेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध एका नवीन उंचीवर पोहोचत असल्याचे दिसत आहे.
या वर्षातील ही दोन्ही नेत्यांची तिसरी अधिकृत भेट आहे. या भेटीत व्यापार, गुंतवणूक, विज्ञान-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), शिक्षण, दहशतवादविरोधी सहकार्य तसेच सुरक्षा क्षेत्रातील वाढती भागीदारी या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल देखील या बैठकीला उपस्थित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
भारत आणि इटलीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेताना दोन्ही देशांनी २०२५–२०२९ या कालावधीसाठी संयुक्त धोरणात्मक सहकार योजनेची तयारी सुरू असल्याची पुष्टी केली. या योजनांमुळे व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि एआय क्षेत्रात नव्या करारांची शक्यता वाढणार आहे. आकडेवारीनुसार, २०२३–२४ मध्ये भारत-इटली व्यापार १५ अब्ज डॉलर्सच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतो. तसेच, वर्ष २००० पासून इटलीकडून भारतात ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या भेटीमध्ये २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या एआय समिटला जॉर्जिया मेलोनी यांनी संपूर्ण समर्थन जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वेगाने वाढणारे संशोधन आणि बदलता जागतिक नकाशा लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
PM @narendramodi met PM @GiorgiaMeloni on the sidelines of G20 summit in Johannesburg, South Africa. Their talks centred around deepening 🇮🇳-🇮🇹 ties in trade, investment, technology, AI, defence and security, space, research, innovation and culture. Both leaders expressed… pic.twitter.com/SQfFok66LQ — Randhir Jaiswal (@MEAIndia) November 23, 2025
credit : social media
जागतिक राजकीय तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही नेत्यांची मैत्री आणि संवाद विशेष चर्चेत असते. G-20 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये त्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसत होत्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण
आधीपासूनच या दोन्ही नेत्यांची मैत्री जगभर चर्चेत आहे. कॅनडामध्ये जून २०२५ मध्ये झालेल्या G-7 परिषदेत आणि दुबईतील COP28 बैठकित दोघांचा सेल्फी चर्चेत राहिला होता. COP28 च्या पोस्टमध्ये मेलोनी यांनी लिहिले होते “Good friends at COP28.” या भेटीमुळे भारत–इटली संबंध अधिक दृढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. जागतिक धोरणात्मक संतुलन, भविष्यातील तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याच्या संदर्भात ही बैठक निर्णायक ठरू शकते.
Ans: द्विपक्षीय व्यापार, एआय आणि धोरणात्मक सहकार्यासाठी.
Ans: अंदाजे १५ अब्ज डॉलर्स (२०२३–२४).
Ans: २०२६ मध्ये भारतातील एआय समिट, ज्याला इटलीने समर्थन दिले आहे.






