John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ex-CIA officer India statement : अमेरिकेच्या नामांकित गुप्तचर संस्था सीआयएचे माजी अधिकारी (Ex-CIA) जॉन किरियाकौ (john kiriakou) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण? त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्धाबाबत केलेला धडाकेबाज दावा आणि त्यानंतर पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रतिक्रिया. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानच्या राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात खळबळ उडाली आहे.
किरियाकौ यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आणि पॉडकास्टमध्ये स्पष्टपणे म्हटले की,
“भारत आणि पाकिस्तानमध्ये पारंपरिक युद्ध झाले, तर भारत सहज जिंकेल.”
या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधून त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आणि धमक्या मिळू लागल्या. त्याचबरोबर माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने त्यांना औपचारिक ईमेलद्वारे माफी मागण्याची मागणी देखील केली.
किरियाकौ यांनी अमेरिकन होस्ट जूलियन डोरे यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितले,
“मी मुलाखतीत भारत पाकिस्तानला हरवेल असे सांगितले होते. त्यानंतर मला असंख्य जीव घेण्याच्या धमक्या मिळू लागल्या. माझ्या वकिलांनी मला काही दिवस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.”
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील अनेक कट्टर गट आणि काही राजकीय मंडळी रागावली होती. धमक्यांची संख्या इतकी होती की त्यांची गणना करणे अशक्य झाले.
The Pakistanis sent a letter demanding an apology from CIA officer John Kiriakou for his statement, that India would beat Pakistan in conventional war. He responded by “wiping his ass with the letter sent by Pakistanis”. pic.twitter.com/loF6jL20SV — Rohit Sharma 🇺🇸🇮🇳 (@DcWalaDesi) November 20, 2025
credit : social media
या मुलाखतीनंतर पीटीआय पक्षाकडून त्यांना एक ईमेल प्राप्त झाला. त्या पत्रामध्ये त्यांनी भारताबद्दल व्यक्त केलेल्या मताचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि इम्रान खान, पाकिस्तानी जनता आणि पक्षाकडून सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली. किरियाकौ यांनी या भागात अतिशय धक्कादायक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले,
“माझ्या वकिलांनी पत्र कचर्यात टाकायला सांगितले. पण मी त्याचा वापर टॉयलेट पेपरसारखा करून ते पुसून शौचालयात फ्लश केले.”
त्यांनी नंतर पीटीआयला त्याच अर्थाचा ईमेल पाठवून उत्तर दिले.
किरियाकौ यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये ANI ला दिलेल्या मुलाखतीतही याच प्रकारचे विधान केले होते. त्यांनी सांगितले होते की, 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यानंतर भारताने सीमा सज्ज केली तेव्हा सीआयएला युद्ध भडकण्याची भीती वाटत होती.
जॉन किरियाकौ हे अमेरिकेचे माजी CIA अधिकारी आणि लेखक आहेत. 2007 मध्ये CIA च्या छळनीतीचा खुलासा केल्यामुळे ते चर्चेत आले. अमेरिकेची प्रतिमा खराब केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना 23 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र नंतर ती कमी करण्यात आली.
किरियाकौ म्हणतात,
“मला कोणताही पश्चाताप नाही. मी योग्य ते केले.”
Ans: ते अमेरिकेचे माजी CIA अधिकारी आणि व्हिसलब्लोअर आहेत.
Ans: त्यांच्या मते, युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानला सहज पराभूत करेल.
Ans: त्यांना धमक्या मिळाल्या आणि इम्रान खान पक्षाने त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली.






