Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर

Ex-CIA अधिकारी जॉन किरियाकोऊ यांनी अलिकडेच दावा केला होता की भारत थेट युद्धात पाकिस्तानला सहज पराभूत करेल. त्यांच्या विधानानंतर, पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाने त्यांना एक पत्र पाठवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 21, 2025 | 12:25 PM
Ex-CIA officer says India would easily defeat Pakistan Imran Khan’s party responds with a letter

Ex-CIA officer says India would easily defeat Pakistan Imran Khan’s party responds with a letter

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी CIA अधिकारी जॉन किरियाकौ यांनी दावा केला की भारत युद्धात पाकिस्तानला सहज पराभूत करेल.
  • या वक्तव्यानंतर त्यांना पाकिस्तानकडून धमक्या आणि इम्रान खान यांच्या पक्षाकडून माफीची मागणी करणारे पत्र मिळाले.
  • credit : social mediazकिरियाकौ यांनी त्या पत्राचा टॉयलेट पेपरसारखा वापर केल्याचे धक्कादायक वक्तव्य केले.

Ex-CIA officer India statement : अमेरिकेच्या नामांकित गुप्तचर संस्था सीआयएचे माजी अधिकारी (Ex-CIA) जॉन किरियाकौ (john kiriakou) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण? त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्धाबाबत केलेला धडाकेबाज दावा आणि त्यानंतर पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रतिक्रिया. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानच्या राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किरियाकौ यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आणि पॉडकास्टमध्ये स्पष्टपणे म्हटले की,

“भारत आणि पाकिस्तानमध्ये पारंपरिक युद्ध झाले, तर भारत सहज जिंकेल.”

या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधून त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आणि धमक्या मिळू लागल्या. त्याचबरोबर माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने त्यांना औपचारिक ईमेलद्वारे माफी मागण्याची मागणी देखील केली.

धमक्या आणि वकीलांचा सल्ला

किरियाकौ यांनी अमेरिकन होस्ट जूलियन डोरे यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितले,

“मी मुलाखतीत भारत पाकिस्तानला हरवेल असे सांगितले होते. त्यानंतर मला असंख्य जीव घेण्याच्या धमक्या मिळू लागल्या. माझ्या वकिलांनी मला काही दिवस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.”

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील अनेक कट्टर गट आणि काही राजकीय मंडळी रागावली होती. धमक्यांची संख्या इतकी होती की त्यांची गणना करणे अशक्य झाले.

The Pakistanis sent a letter demanding an apology from CIA officer John Kiriakou for his statement, that India would beat Pakistan in conventional war. He responded by “wiping his ass with the letter sent by Pakistanis”. pic.twitter.com/loF6jL20SV — Rohit Sharma 🇺🇸🇮🇳 (@DcWalaDesi) November 20, 2025

credit : social media

इम्रान खान यांच्या पक्षाचे पत्र… आणि धक्कादायक प्रतिक्रिया

या मुलाखतीनंतर पीटीआय पक्षाकडून त्यांना एक ईमेल प्राप्त झाला. त्या पत्रामध्ये त्यांनी भारताबद्दल व्यक्त केलेल्या मताचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि इम्रान खान, पाकिस्तानी जनता आणि पक्षाकडून सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली. किरियाकौ यांनी या भागात अतिशय धक्कादायक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले,

“माझ्या वकिलांनी पत्र कचर्‍यात टाकायला सांगितले. पण मी त्याचा वापर टॉयलेट पेपरसारखा करून ते पुसून शौचालयात फ्लश केले.”

त्यांनी नंतर पीटीआयला त्याच अर्थाचा ईमेल पाठवून उत्तर दिले.

पूर्वीही भारताबद्दल भाकीत

किरियाकौ यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये ANI ला दिलेल्या मुलाखतीतही याच प्रकारचे विधान केले होते. त्यांनी सांगितले होते की, 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यानंतर भारताने सीमा सज्ज केली तेव्हा सीआयएला युद्ध भडकण्याची भीती वाटत होती.

जॉन किरियाकौ कोण आहेत?

जॉन किरियाकौ हे अमेरिकेचे माजी CIA अधिकारी आणि लेखक आहेत. 2007 मध्ये CIA च्या छळनीतीचा खुलासा केल्यामुळे ते चर्चेत आले. अमेरिकेची प्रतिमा खराब केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना 23 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र नंतर ती कमी करण्यात आली.

किरियाकौ म्हणतात,

“मला कोणताही पश्चाताप नाही. मी योग्य ते केले.”
💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी CIA अधिकारी जॉन किरियाकौ कोण आहेत?

    Ans: ते अमेरिकेचे माजी CIA अधिकारी आणि व्हिसलब्लोअर आहेत.

  • Que: त्यांनी भारताबद्दल काय म्हटले?

    Ans: त्यांच्या मते, युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानला सहज पराभूत करेल.

  • Que: पाकिस्तानची प्रतिक्रिया काय होती?

    Ans: त्यांना धमक्या मिळाल्या आणि इम्रान खान पक्षाने त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली.

Web Title: Ex cia officer says india would easily defeat pakistan imran khans party responds with a letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • America
  • india
  • International Political news

संबंधित बातम्या

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक
1

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित
2

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
3

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

Israel Support India: सायबर सुरक्षा क्षेत्रात भारताला इस्त्राईलची साथ; शत्रूंचे प्रत्येक षडयंत्र होणार निष्प्रभ
4

Israel Support India: सायबर सुरक्षा क्षेत्रात भारताला इस्त्राईलची साथ; शत्रूंचे प्रत्येक षडयंत्र होणार निष्प्रभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.