Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump Jr high-profile India Tour : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (Trump Jr )हे सध्या भारताच्या एका अतिशय चर्चित आणि हाय-प्रोफाइल दौऱ्यावर आले आहेत. या भेटीने केवळ भारतीय माध्यमांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधले आहे. त्यांच्या या खास आणि ग्लॅमरस दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आग्रा येथील ताजमहालपासून झाली.
आग्रा येथे पोहोचताच, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ट्रम्प ज्युनियर यांनी ताजमहालला भेट दिली. जवळजवळ एक तास त्यांनी या स्मारकाची भव्यता, कलात्मकता आणि इतिहासाचा अनुभव घेतला. ताजमहालसमोर असलेल्या लोकप्रिय “डायना बेंच” वर त्यांनी फोटोसुद्धा घेतला, ज्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये त्यांच्या वडिलांनी, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच मार्गदर्शक नितीन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ताजमहालाला भेट दिली होती. या दौऱ्यात अमेरिकन सुरक्षा पथक, स्थानिक पोलिस आणि CISF यांच्या तुफान सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या होत्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Japan Crisis : ‘चीनने जपानला दिला मोठा धक्का…’आणि भारताची लागली लॉटरी; आता Trump tariffsचे टेन्शनही संपले
ताजमहाल भेटीनंतर त्यांचा ताफा थेट जामनगरकडे रवाना झाला, जिथे ते अनंत अंबानी आणि अंबानी परिवाराचे विशेष पाहुणे होते. या भेटीदरम्यान त्यांनी वंतारा वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वन्यजीव संवर्धन प्रकल्पांपैकी एक मानले जाते. ट्रम्प ज्युनियर यांनी वनताऱ्याचा परिसर पाहताना प्राणिसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल अंबानी परिवाराचे समर्पण पाहून खूप प्रशंसा व्यक्त केली. याच ठिकाणी त्यांनी गणपती मंदिर आणि इतर पवित्र स्थळांना भेट देत पूजा-अर्चनाही केली. त्यांनी हा अनुभव “अविस्मरणीय, आध्यात्मिक आणि भारताच्या आदरातिथ्याचा अद्वितीय नमुना” असे सांगितले.
या ग्लॅमरस दौऱ्याचा तिसरा आणि सर्वात चर्चित टप्पा आहे उदयपूर. इथे ते एका हाय-प्रोफाइल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सहभागी होणार आहेत. हे लग्न दक्षिण भारतातील मोठ्या व्यापारी राजू मंटेना यांच्या मुलाचे असून वधू अमेरिकन वंशाची आहे. दोन्ही कुटुंबांचे अमेरिकेशी व्यावसायिक आणि राजकीय संबंध असून ट्रम्प परिवाराशी जवळचे संबंध असल्यामुळे ट्रम्प ज्युनियर यांचे आगमन विशेष ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
सिटी पॅलेस
जगमंदिर पॅलेस
ट्रम्प ज्युनियर लीला पॅलेस, पिचोला लेकच्या मध्यभागी असलेल्या आलिशान पॅलेसमध्ये थांबले आहेत. या शाही लग्नाला हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस, कृती सॅनन यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही त्यांची भारताची दुसरी भेट असून पूर्वी ते २०१८ मध्ये आले होते.
Ans: ते हाय-प्रोफाइल खाजगी भेटीसाठी, वंतारा दौरा आणि उदयपूरच्या लग्नासाठी भारतात आले आहेत.
Ans: ताजमहाल, जामनगर वंतारा सेंटर आणि उदयपूर लग्नस्थळ.
Ans: हृतिक रोशन, कृती सॅनन, जॅकलिन फर्नांडिस व इतर नामांकित व्यक्तींंची उपस्थिती अपेक्षित.






