
Seattle Airport ICE Action : विमानात चढताना अचानक ICE अधिकाऱ्यांची कारवाई; दोन प्रवाशांना अटक, सिएटल विमानतळावर गोंधळ!
Seattle Airport ICE Action : अमेरिकेतील सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा गोंधळ उडाला होता. विमानात चढण्यासाठी रांगेत असलेल्या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अचानक ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान प्रवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी लॉस एंजेलिसला जाणाऱ्या विमानाच्या बोर्डिंग प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्यासह विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला.
शनिवारी सकाळी अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 1306 मध्ये प्रवासी चढत असताना ही घटना घडली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी या विमानाचे उड्डाण नियोजित होते. मात्र, विमानाच्या जेट ब्रिजवरच ICE च्या दोन गुप्त अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये इमिग्रेशन अधिकारी एका व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी संबंधित व्यक्ती जमिनीवर झटापट करत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. एका महिलेने अधिकाऱ्यांवर आपल्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचा आरोप केला. ताब्यात घेतल्या जात असलेल्या तरुणीकडे वैध वर्क परमिट असल्याचा दावा या महिलेने केला.
दरम्यान, ICE ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 8 वाजून 5 मिनिटांनी ही ठारावीक कारवाई करण्यात आल्याचे एजन्सीने सांगितले. मेक्सिकोचा नागरिक रिकार्डो लारोंडो मेंडोझा याला अटक करणे हा या कारवाईचा उद्देश होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो अमेरिकेत राहत असल्याचा आरोप ICE ने केला आहे.
🛑 ICE Detains Father and Daughter on a Jet Bridge at Seattle-Tacoma Airport 🛑 “They’re taking my dad, Ricardo Laronga! We don’t have papers, we have a work permit!” Well, that’s that. A work permit is NOT legal status. An Employment Authorization Document is permission to work, nothing more. It is handed out to people with pending asylum claims and other applications, including people who crossed illegally. And “we don’t have papers” tells everyone exactly where he stands. Federal law, 8 U.S.C. 1357, gives immigration officers the authority to arrest without a warrant anyone they have reason to believe is in the country illegally. An airport jet bridge is no sanctuary. I hope ICE checks their papers too. Maybe they did, because they came back and arrested her too. Good job boys! What are they doing here? Anchor babies, thanks to Amy Coney Barrett and John Roberts, the two traitors on the bench? — Katie K USA (@KimKatieUSA) November 21, 2026
या कारवाईदरम्यान काही प्रवाशांनी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ICE ने केला. एका प्रवाशाने अधिकाऱ्यांवर गरम कॉफी फेकल्याचा आरोपही एजन्सीने केला आहे. ही प्रवासी मेक्सिकोची नागरिक सोफिया हर्नांडेज मेजिया असल्याचे ICE ने सांगितले. तिचाही व्हिसा संपला होता. तिला अटक करण्यात आली असून, एका संघीय अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले.
World News : ट्रम्प यांचा इराणला इशारा; अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी कराराचा निर्धार
या घटनेनंतर अलास्का एअरलाइन्सनेही चिंता व्यक्त केली आहे. विमानात प्रवासी चढत असताना सुरू झालेल्या या कारवाईची पूर्वसूचना आपल्याला देण्यात आली नव्हती, असे एअरलाइनने स्पष्ट केले. या कारवाईमुळे कर्मचारी आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाची जाणीव असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अलास्का एअरलाइन्स पोर्ट ऑफ सिएटलसोबत काम करत आहे. कारवाईदरम्यान निर्धारित प्रक्रिया आणि नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी केली जाणार आहे. विमानात प्रवासी चढत असताना अशा प्रकारची कारवाई कोणत्या प्रक्रियेनुसार करण्यात आली, याबाबतही एअरलाइनने संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
Ans: सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात चढत असताना ICE अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विमानतळावर गोंधळ निर्माण झाला.
Ans: रिकार्डो लारोंडो मेंडोझा आणि सोफिया हर्नांडेज मेजिया या मेक्सिकोच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आल्याचे ICE ने सांगितले.
Ans: दोघेही व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहत असल्याचा आरोप ICE ने केला आहे. सोफियावर एका संघीय अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.