Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी

Operation Hard Ball : अमेरिकेच्या FBI आणि न्याय विभागाने ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात मोठी कारवाई केली आहे. कॅनडा, अमेरिका आणि युरोपमधून टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात संघीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 11:12 AM
FBI Arrests Lawrence Bishoni Gang Members

FBI Arrests Lawrence Bishoni Gang Members

Follow Us
Follow Us:
  • FBI चे ऑपरेशन हार्ड बॉल
  • लॉरेन्स बिश्नोई गँगच्या २४ सदस्यांना अटक
  • अमेरिका, कॅनडासह युरोपमध्ये छापेमारी
Operation Hard Ball : अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि FBI ने लॉरेन्स बिश्नोईसह भारतातील तीन संघटित टोळीविरोधात मोठी आंतरराष्ट्रीय मोहिम राबवली आहे. ऑपरेशन हार्ड बॉल’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले असून अमेरिका, कॅनडा, आणि युरोपमधील ५० हून अधिक ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले असून आतापर्यंत २४ सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने छापेमारीदरम्यान गँगच्या २४ सदस्यांना ताब्यात घेतले असून यातील ११ जणांना कॅलिफोर्नियातून उचलण्यात आले आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतातील तीन संघटित गुन्हेगारी गटांशी संबंधित ३७ जणांविरोधात संघीय दाखल केले आहेत.

यातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. तपासादरम्यान एफबीआयला सुमारे १००० किलो कोकेन, १ किलो हेरॉइन, १२ शस्त्रे, ४० हजार अमेरिकी डॉलर रोख जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हेगारांचा संबंध हत्या, वसूली, अमली पदार्थ तस्करी, अपहरण आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या व्यवहाराशी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तुरुंगातून चालवत होता गुन्हेगारीचे नेटवर्क

अमेरिकेच्या आरोपानुसार, भारताच्या तुरुंगात असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई अवैध मोबाईल फोन आणि एन्क्रिप्टेड संवाद माध्यमांचा वापर करुन परदेशात गुन्हेगारी नेटवर्क चालवत होता. तर दुसरीकडे गोल्डी बरार उत्तर अमेरिकेत रोहित गौदारा गुन्हेगारी कारवाया संभाळत असल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.

आरोपपत्रानुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगने उत्तर अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांना धमकावून पैस उकळणे, अमली पदार्थांची तस्करी, हिंसक गुन्हे घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेटवर्क उभे केले होते. यानुसार जून २०२३ मध्ये कॅनडातील सरे येथे हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरारने रचल्याचाही आरोप आहे. सध्या यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. कॅनडा सरकारने २०२५ मध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

आणखी दोन टोळ्यांविरोधात कारवाई

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत भगवानपुरिया आणि रविंदर सिंग ढांडा यांच्या गुन्हेगारी नेटवर्कविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. भगवानपुरियावर सुपारी घेऊन हत्या केल्याचा, शस्त्रांच्या तस्करी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. तर ढांडावर कॅलिफोर्नियातून कॅनडापर्यंत मेथॅम्फेटामाइन आणि कोकेनची तस्करी केल्यता आरोप करण्यात आला आहे.

FBI-led Operation Hard Ball charges 37 members of India-based crime gangs, including Bishnoi syndicate, over drug trafficking and the 2023 killing of Khalistani extremist Hardeep Singh Nijjar.pic.twitter.com/o7cWBHjmp3 — Sidhant Sibal (@sidhant) July 8, 2026


Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

Web Title: Fbi lawrence bishnoi gang crackdown us canada europe raids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • World news

संबंधित बातम्या

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
1

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
3

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO
4

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.