FBI takes major action in America, 8 Khalistani terrorists including Pavitra Batala arrested
वॉशिंग्टन : एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेत खलिस्तानी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतातून अमेरिकेत लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतद्यांना एफबीआयने अटक केली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोक्विन काऊंटीमध्ये एका छापेमारीदरम्यान एफबीआने भारतीय वंशांच्या आठ आरोपींना अटक केली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ११ जुलै २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्टॉकॉन, मंटेका, स्टॅनिस्लॉस काऊंटीच्या SWAT टीम्स आणि एफबीआयच्या स्पेशल युनिट्सने एकत्रितपणे केली. याचा मुख्य उद्देश एका अपहरण आणि छळाच्या प्रकरणाची चौकशी करणे होता.
आरोपींमध्ये दिलप्रीत सिंह, अर्शप्रीत सिंह, अमृतपाल सिंह, विशाल, पवित्र सिंह उर्फ पवित्र बटाला, गुरताज सिंह आणि मनप्रीत रंधावा या गुन्हेरांना एफबीआयने अटक केली आहे. या सर्व दहशतवाद्यांविरोधात कठोक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अमेरिकेच्या तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
या सर्वांवर अपहरण, छळ, बेकायदेशीर कैद, गुन्हेगारी कट, साक्षीदारांना धमकावणे, तसेच सेमी-ऑटोमॅटिक शस्त्रांचा हल्ला आणि दहशत निर्माण करण्याचे आरोप ठोठवण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात बेकायदेशीक शस्त्र बाळगणे, मशीन गन व असॉल्ट रायफल्स ठेवणे, शॉर्ट बॅरल रायफल तयार करणे आणि त्यांची तस्करी करण्याचेही आरोप या सर्व दहशतवाद्यांवर आहेत.
या तपासात भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारालाही अटत करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान एफबीआय पोलिसांना ५ पिस्तुल, १ असॉल्ट रायफल, शेकडो काडतुसं, हाय-कॅपॅसिटी मॅदजिन आणि १५ डॉलर्सहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात भारताचा सर्वात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पवित्र सिंह उर्फ पवित्र बटाला याला अटक करण्यात मोठे यश मिळाले आहे. बटालाचा संबंध बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी आहे.
या संघटनेवर NIAकडून बंदी घालण्यात आली होती. NIA एक आरोपपत्र दाखल केले होते. तसेच इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीसह जारी करण्यात आली आहे. एफबीआयने समर हीट इनिशिएटिव्ह अंतर्गत अमेरिकेतील गुन्हेगारांना अटत करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत गुन्हेगारी नेटवर्कचा नाश करण्याचा यामागचा उद्देश आहे.