Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terrorist Attacks : नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट, ‘AI’ चा वापर करून दहशतवादी देणार चकवा

ISIS New Year attack plot 2025 : इस्लामिक स्टेटचे दहशतवादी नवीन वर्षाच्या दिवशी हल्ल्यांची योजना आखत आहेत. सौदी अरेबिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समधून सांकेतिक संदेश पाठवण्यात आले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 22, 2025 | 12:54 PM
ISIS plans major attacks globally Terrorists will use AI to trick people

ISIS plans major attacks globally Terrorists will use AI to trick people

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्लामिक स्टेट (ISIS) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यत्यय आणण्यासाठी मध्य पूर्व, युरोप आणि आशियामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान रचत आहे.
  • आयसिसचे दहशतवादी आता एआय (AI) आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून ‘लोन वुल्फ’ हल्ल्यांचे नियोजन करत असून संघटनेकडे सध्या १०,००० लढवय्ये सक्रिय आहेत.
  • सिडनी आणि ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांनंतर आता युरोपमधील चर्च, ख्रिसमस मार्केट आणि ज्यू स्थळांवर हल्ल्याचा धोका वाढल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

ISIS New Year attack plot 2025 : संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच एक अत्यंत भीतीदायक बातमी समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठलेली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. अमेरिकन मासिक ‘न्यूजवीक’ने (Newsweek) प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, आयसिसचे दहशतवादी नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये रक्ताचा खेळ खेळण्याच्या तयारीत आहेत. सौदी अरेबिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या देशांतून मिळालेल्या काही संशयास्पद ‘सांकेतिक संदेशांनी’ (Coded Messages) जागतिक सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.

धाक वाढला: १०,००० दहशतवाद्यांची फौज सज्ज

अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर ही संघटना कमकुवत झाल्याचे वाटत होते, परंतु २०२५ मध्ये आयसिसने पुन्हा एकदा स्वतःला संघटित केले आहे. सद्यस्थितीत या संघटनेकडे १०,००० हून अधिक कट्टर लढवय्ये असून ते जगभरात पसरलेले आहेत. एकट्या सीरियामध्ये २,५००, आफ्रिकेत १,२०० आणि शेजारील पाकिस्तानात ३०० दहशतवादी सक्रिय आहेत. अलिकडेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या भीषण हल्ल्याने, ज्यामध्ये १६ निष्पापांचा बळी गेला, आयसिस अजूनही किती घातक आहे हे जगाला दाखवून दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

‘एआय’ आणि ऑनलाइन रेडिकलायझेशन: युक्ती बदलली!

यावेळचा धोका अधिक गंभीर असण्याचे कारण म्हणजे आयसिसने आपली कार्यपद्धती बदलली आहे. आता हे दहशतवादी केवळ बंदुका आणि बॉम्बवर अवलंबून नाहीत. आयसिसच्या ‘अल-नबा’ मासिकातून असे उघड झाले आहे की, संघटनेने आता ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. दहशतवाद्यांना आता फक्त विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर ते स्वतः एआयच्या मदतीने हल्ल्याची ठिकाणे, वेळ आणि मार्ग शोधतात. यामुळे गुप्तचर यंत्रणांना त्यांचा माग काढणे अत्यंत कठीण झाले आहे.

USA just busted a planned New Years event IED based terror attack. It’s not far !!! Their actions will have consequences pic.twitter.com/8cWkTBGGfE — Aadi Achint 🇮🇳 (@AadiAchint) December 15, 2025

credit : social media and Twitter

ख्रिश्चन आणि ज्यू स्थळे निशाण्यावर

२०२५ मधील आयसिसच्या हालचाली पाहता, त्यांचे मुख्य लक्ष्य ख्रिश्चन आणि ज्यू समुदाय असल्याचे दिसून येते. मध्य पूर्व आणि युरोपमधील चर्च, प्रार्थना स्थळे आणि गर्दीचे उत्सव हे त्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट्स’ आहेत. नुकतेच जर्मनी आणि पोलंडमधील ख्रिसमस मार्केटमध्ये होणारे मोठे हल्ले पोलिसांनी उधळून लावले, अन्यथा तिथे रक्ताचे पाट वाहू शकले असते. ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर ज्यू समुदायावर झालेला हल्ला ही याच मोठ्या कटाची एक छोटी झलक असल्याचे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल

भारतासह जगाला खबरदारीची गरज

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जगभरात पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत आयसिसचे हे ‘लोन वुल्फ’ (एकाकी हल्लेखोर) कधी आणि कुठे हल्ला करतील, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. अनेक देशांनी आधीच सुरक्षा व्यवस्था कडक केली असून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. नवीन वर्ष साजरे करताना नागरिकांनीही सतर्क राहणे आता काळाची गरज बनली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयसिस नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्या ठिकाणी हल्ल्याचा विचार करत आहे?

    Ans: आयसिस प्रामुख्याने युरोप आणि मध्य पूर्वेतील चर्च, ख्रिसमस मार्केट आणि ज्यू प्रार्थना स्थळांना लक्ष्य करत असल्याचे गुप्तचर अहवालात म्हटले आहे.

  • Que: दहशतवादी एआय (AI) चा वापर कसा करत आहेत?

    Ans: दहशतवादी आता हल्ल्यांचे नियोजन, ठिकाणांचा शोध आणि सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदत घेत आहेत.

  • Que: सध्या जगभरात आयसिसचे किती दहशतवादी सक्रिय आहेत?

    Ans: ताज्या आकडेवारीनुसार, इस्लामिक स्टेटकडे सध्या सुमारे १०,००० सक्रिय लढवय्ये आहेत, जे सीरिया, आफ्रिका आणि पाकिस्तानात पसरलेले आहेत.

Web Title: Fear looms over new year celebrations isis plans major attacks globally terrorists will use ai to trick people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Christmas
  • international news
  • new year 2026
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Global Teacher Prize: भारताची लेक दुबईत चमकली! भारतीय शिक्षिकेला शेखने दिले 8 कोटी; डोळ्यांत पाणी आणणारी रुबल नागींची ‘मिसाल’
1

Global Teacher Prize: भारताची लेक दुबईत चमकली! भारतीय शिक्षिकेला शेखने दिले 8 कोटी; डोळ्यांत पाणी आणणारी रुबल नागींची ‘मिसाल’

E-Waste Ban 2026: बापरे! 150 कोटी डॉलर्सचा ई-कचरा जप्त; मलेशियाने जगाला दाखवला आरसा; घेतला कठोर पवित्रा
2

E-Waste Ban 2026: बापरे! 150 कोटी डॉलर्सचा ई-कचरा जप्त; मलेशियाने जगाला दाखवला आरसा; घेतला कठोर पवित्रा

इराणमध्ये मोठी क्रांती! जोरदार निदर्शनानंतर महिलांना मिळाले बाईक चालवण्याचे स्वातंत्र्य
3

इराणमध्ये मोठी क्रांती! जोरदार निदर्शनानंतर महिलांना मिळाले बाईक चालवण्याचे स्वातंत्र्य

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
4

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.