Five killed in russian missile and drone attack on ukraine, says zelensky
Russia Ukraine War News Marathi : कीव : गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबण्याचे काय नाव घेईना. नुकतेच रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. सलग दोन दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरु आहे. शनिवारी (०४ ऑक्टोबर) रात्रभर रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन, क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले केले आहे. या हल्ल्यांमध्ये किमान पाच नागरिक ठार झाल्याचे वृत्त समोर आहे.
रशियाने युक्रेनमधील नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे युक्रेनच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विनाश झाला आहे. यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी संताप व्यक्त केला आहे.
PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या नऊ वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ५० हून अधिक बॅलेस्टिक, ५०० ड्रोन डागले आहे. झेलेन्स्की यांचा मते, हा हल्ला अत्यंत संघटित आणि व्यापार होता. या हल्ल्याचा उद्देश युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीती पसरवणे आणि पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचवणे होते. हा हल्ला युक्रेनच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरला आहे. रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनच्या ल्विव्ह शहराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ल्विव्हमधील चार नागरिक या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. अनेक नागरिकही जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. शहराच्या बाहेर एका कारखान्यालाही आग लागही होती. काही तासांच्या प्रयत्नांनतर ही आग विझवण्यात आली.
‼️More than 50 missiles and about 500 drones were launched by russia at Ukraine today. There are reports of 5 dead and over 10 wounded, – Zelenskyy pic.twitter.com/JtuhqtOnje — Angelica Shalagina🇺🇦 (@angelshalagina) October 5, 2025
रशियन हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक भागांमध्ये वीज, दळवळण, आणि पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहे. ५० हजारांहून अधिक घरे अंधारात बुडाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाच्या हल्ल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याला बेकायदेशीर आणि नागरिकांवरील हिंसाचाराचे कृत्य म्हणून संबोधले जात आहे.
प्रश्न १. रशिया युक्रेन युद्ध किती वर्षांपासून सुरु आहे?
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.
प्रश्न २. रशियाने युक्रेनवर किती ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली?
रशियाने युक्रेनवर ५०० ड्रोन आणि ५० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे?
प्रश्न ३. रशिया युक्रेनमध्ये कशाला लक्ष्य केले?
रशियाने युक्रेनमध्ये नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे.
प्रश्न ४. रशियाच्या नुकत्याच झालेल्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाल आहे?
रशियाने नुकतेच युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.