Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

Flydubai Hijack : ओमानमध्ये जन्मलेला तो पायलट आठ महिन्यांपूर्वी फ्लायदुबईमध्ये रुजू झाला होता. साधारण त्याच वेळी, अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला चढवला. मात्र, या प्रकरणात इराणचा सहभाग होता की नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 01, 2026 | 02:11 PM
Flydubai flight hijack scare Omani co-pilot attack Flydubai

Flydubai flight hijack scare Omani co-pilot attack Flydubai

Follow Us
Follow Us:
  • आकाशात भीषण कट उधळला
  • भारतीय पायलटचे शौर्य
  • सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग

मध्यपूर्वेत वाढत्या राजकीय आणि लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर २०२६ रोजी हवेत एका भीषण दुर्घटनेची सावली निर्माण झाली होती. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलमधील तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाकडे उड्डाण केलेल्या ‘फ्लायदुबई’च्या एफझेड १०७३ (FZ 1073) या विमानात सुमारे १७४ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. हे विमान जॉर्डन आणि इस्रायली हवाई हद्दीच्या जवळ सुमारे ३४,००० फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमध्ये एक भीषण संघर्ष सुरू झाला. विमानाचा ओमान वंशाचा सहवैमानिक, जो आठ महिन्यांपूर्वीच फ्लायदुबई कंपनीत रुजू झाला होता, त्याने मुख्य वैमानिकावर प्राणघातक हल्ला चढवून विमान दुर्घटनाग्रस्त करण्याचा अथवा अपहरण करण्याचा प्रयत्न केला.(Flydubai Hijack)

भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले असीम धैर्य

या भीषण प्रसंगी कॉकपिटमध्ये उपस्थित असलेले मुख्य वैमानिक, भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले असीम धैर्य आणि प्रसंगावधान संपूर्ण जगासाठी कौतुकाचा विषय बनले आहे. ओमानी सहवैमानिकाने अचानक चाकूने हल्ला करून कॅप्टन स्मित यांना गंभीर जखमी केले. कॉकपिटमधील संघर्षादरम्यान विमानाचे नियंत्रण काही क्षणांसाठी सुटल्यामुळे बोईंग ७३७ मॅक्स विमान अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १७,५० cut फुटांपर्यंत खाली कोसळले. यामुळे विमानात तीव्र दाब निर्माण झाला आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

कॅप्टन स्मित यांनी नियंत्रण सुटू दिले नाही

गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत असूनही कॅप्टन स्मित यांनी नियंत्रण सुटू दिले नाही. त्यांनी अत्यंत तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) आपत्कालीन सिग्नल पाठवले, ज्यामध्ये सामान्य आपत्कालीन परिस्थितीचा ‘7700’ कोड आणि विमान अपहाराची सूचना देणारा आंतरराष्ट्रीय ‘7500’ (Squawk 7500) कोड समाविष्ट होता. हा सिग्नल मिळताच इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि युएईच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायली हवाई दलाची फायटर विमाने तातडीने आकाशात झेपावली.

आणि विमान वेगाने खाली येत असल्याचे…

कॉकपिटमधील ओरडण्याचा आवाज ऐकून आणि विमान वेगाने खाली येत असल्याचे जाणवताच विमानात उपस्थित असलेल्या काही इस्रायली प्रवाशांनी व केबिन क्रूने धाव घेतली. प्रवाशांमध्ये प्रवास करत असलेल्या दोन सुट्टीवरील वैमानिकांनी आणि प्रवाशांनी कॉकपिटचे दार उघडून हल्लेखोर ओमानी सहवैमानिकाला पकडले आणि त्याला जागीच रोखून धरले. विमानात उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने जखमी कॅप्टन स्मित यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. यानंतर, प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण हातात घेतले आणि विमान सौदी अरेबियातील ‘प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज’ (तबुक) विमानतळाकडे वळवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

ओमानी सहवैमानिकाला ताब्यात घेतले

सौदी अरेबियात विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर सौदी सुरक्षा दलाने तातडीने विमानात प्रवेश करून हल्लेखोर ओमानी सहवैमानिकाला ताब्यात घेतले. जखमी कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सौदीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जगभरातील नेत्यांनी कॅप्टन स्मित यांच्या शौर्याचे भरभरून कौतुक केले असून त्यांना खऱ्या अर्थाने ‘द रिअल हिरो’ म्हणून संबोधले आहे. सध्या युएई, इस्रायल, सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्था या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Web Title: Flydubai flight 1073 hijack scare indian pilot smit machchhar saves passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Dubai
  • flight
  • World news

संबंधित बातम्या

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा
1

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.