Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

Smit Machchhar : फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छर यांना विमानातील सर्व १७४ लोकांचे प्राण वाचवण्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल इस्रायलच्या राष्ट्रपतींचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 09, 2026 | 11:47 AM
Israel Presidential Award for Civilian Heroism Smit Machchhar

Israel Presidential Award for Civilian Heroism Smit Machchhar

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान
  • कॉकपिटमधील थरार अन् शौर्य
  • जागतिक पातळीवर कौतुक

आकाशात हजारो फूट उंचावर असताना जेव्हा काळाने समोरून घाला घातला, तेव्हा आपल्या प्राणांची तमा न बाळगता १७४ निष्पाप जीवांचे रक्षण करणाऱ्या एका भारतीय सुपुत्राच्या शौर्याची कथा आज जगभरात अभिमानाने सांगितली जात आहे. फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने कॉकपिटमध्येच विमान हायजॅक करून ते पाडण्याचा भयानक कट रचला होता. परंतु, मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर (Smit Machchhar) यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान, धाडस आणि अद्भूत कौशल्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. या अभूतपूर्व शौर्याची दखल घेत इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलचा (Israel) सर्वोच्च नागरी सन्मान ‘प्रेसिडेंशियल अवॉर्ड फॉर सिव्हिलियन हिरोइझम’ (नागरी शौर्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार) देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

कॉकपिटमध्ये घडलेला तो थरार 

हे दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारे नाट्य हवेत उड्डाण करत असलेल्या फ्लायदुबई विमानामध्ये घडले. विमानाचे सह-वैमानिक हमाम अल-हम्मामी याने अचानक कॉकपिटमध्येच मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. विमान हायजॅक करून ते नष्ट करण्याचा त्याचा डाव होता. अचानक झालेल्या या हल्ल्यात कॅप्टन मच्छर गंभीर जखमी झाले आणि प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगातही कॅप्टन मच्छर यांनी आपले मनोधैर्य खचू दिले नाही. स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत त्यांनी कॉकपिटचा सुरक्षा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. दरवाजा उघडताच विमानात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी आणि कर्तव्यावर नसलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि हल्लेखोर सह-वैमानिकाला पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

#BREAKING: Israeli President @Isaac_Herzog has announced that Braveheart Indian pilot Captain Smit Machchhar will be conferred with Israel’s Presidential Award for Civilian Heroism. https://t.co/2mVsUTyocM — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) October 8, 2026

credit – social media and Twitter

भारतीय वैमानिकाचे अफाट शौर्य

कॉकपिटमध्ये झालेल्या या प्रचंड झटापटीमुळे विमानाचे नियंत्रण काही काळासाठी सुटले होते आणि अवघ्या दोन मिनिटांत विमान तब्बल १६,००० फूट वेगाने खाली आले. हायजॅकिंग आणि अपघाताचा इशारा मिळताच विमानाच्या क्रू मेंबर्सनी अत्यंत कौशल्याने विमानाची दिशा बदलली आणि सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) केले. कॅप्टन स्मित मच्छर यांच्या तत्परतेमुळे विमानातील सर्व १७४ प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुखरूप बचावले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा आणि जागतिक सन्मान

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी या घटनेतील वीरांचा गौरव करताना कॅप्टन स्मित मच्छर यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “कॅप्टन स्मित मच्छर यांनी जखमी अवस्थेतही जे अद्भूत शौर्य दाखवले ते कौतुकास्पद आहे. त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि कर्तव्याची जाणीव अतुलनीय आहे. त्यांनी केवळ १७४ लोकांचे प्राण वाचवले नाहीत, तर एक मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी केला.” कॅप्टन मच्छर सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना इस्रायलचा हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जाईल, असे हर्झोग यांनी स्पष्ट केले.

केवळ इस्रायलच नव्हे, तर अमेरिकेनेही भारतीय कॅप्टनच्या या वीरतेची दखल घेतली आहे. न्यू जर्सीचे काँग्रेस सदस्य जोश गॉटहाइमर यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये स्मित मच्छर यांच्या सन्मानाचा ठराव मांडला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनीही कॅप्टन मच्छर यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना ‘खरा नायक’ म्हणून संबोधित केले आहे. संपूर्ण जगभरातून आज या भारतीय वैमानिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Flydubai indian pilot smit machchhar israel presidential bravery award hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Dubai
  • flight
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
1

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
2

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
3

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
4

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.