
Former PoK PM Chaudhry Anwarul Haq's video goes viral admits Pakistan's direct involvement in Delhi blast
Delhi Blast Revelation : दिल्लीतील(Delhi Blast) १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार स्फोटाने देश हादरला होता. या हल्ल्याच्या तपासात जसजसे धागेदोरे बाहेर येत होते, तसतसे हे प्रकरण अधिक गंभीर होत होते. पण आता या तपासाला एका धक्कादायक वळण देणारा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ आहे पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक( Chaudhary Anwarul Haq) यांचा ज्यात ते उघडपणे दावा करतात (video viral) की दिल्लीतील स्फोटासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे पाकिस्तानच आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून भारत-पाक संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमधील विधानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची दुहेरी भूमिका आणि दहशतवादाला मिळत असलेला सर्वतोपरी पाठिंबा पुन्हा एकदा उघड केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये चौधरी अन्वरुल हक पीओकेच्या विधानसभेमध्ये भाषण करताना दिसतात. त्यांच्या विधानांमध्ये एक धोकादायक अहंकार आणि दहशतवादाला उघड पाठिंबा दिसून येतो. ते म्हणतात:
“जर बलुचिस्तानमध्ये रक्तपात सुरू राहिला तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला प्रत्युत्तर देऊ. आणि आम्ही देत आहोत. आजही ते मृतदेह मोजत आहेत.”
#BREAKING: Former Pakistan Occupied Kashmir PM Chaudhary Anwar Ul Haq admits Pakistan role in Delhi Red Fort bombing, says I had warned earlier that we will hit India at Red Fort and our brave men have done it. Haq was PM till two days ago. Says India unable to count dead bodies. pic.twitter.com/69bOQ2EsH0 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) November 19, 2025
credit : social media
फक्त एवढेच नव्हे तर हक यांनी शाहीन नावाने दहशतवाद्यांना संबोधित करत त्यांना “भारतावर कारवाई करणारे योद्धे” म्हणून गौरवले. हा दावा थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना सरकारी कवच मिळत असल्याचा पुरावा मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात
हक यांनी त्यांच्या भाषणात एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला, ज्याद्वारे पाकिस्तान भारतात सतत तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. या सर्व वादांनंतर हक यांच्यावर पीओकेमध्ये अविश्वास ठराव आणण्यात आला आणि त्यांना पदावरून हटवण्यात आले. परंतु त्यांचे विधान पाकिस्तानच्या ‘छुप्या युद्धा’चे खरे स्वरूप जगासमोर आणते.
भारतीय तपास यंत्रणांनी पुष्टी केली आहे की दिल्लीतील स्फोट जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेने रचलेल्या मॉड्यूलने केला. या स्फोटात १३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सुरक्षा विश्लेषक म्हणतात की पाकिस्तान आता जम्मू-काश्मीरवरून आपले लक्ष वळवून भारताच्या इतर शहरांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक धोकादायक पॅटर्न असून भारतासाठी सुरक्षा रणनीतीत मोठे बदल आवश्यक आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO: एका रात्रीत 476 हल्ले! ड्रोन–मिसाईल महाआक्रमणामुळे टेर्नोपिल हादरले; 25 जण ठार, 19 जण जिवंत जाळले
तपासात असेही उघड झाले आहे की शेकडो पाकिस्तानी अकाउंट्स भारतातील युवकांचा मानसिक दृष्ट्या अस्थिरतेकडे कल वाढवण्यासाठी फेक न्यूज, प्रक्षोभक पोस्ट आणि दहशतवादाला प्रेरित करणारा कंटेंट सतत पसरवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची आयएसआय भारतात नवीन दहशतवादी मॉड्यूल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. याआधीही 2008 चे मुंबई हल्ले किंवा 2019 चा पुलवामा हल्ला, सर्व ठिकाणी पाकिस्तानचा थेट सहभाग सिद्ध झाला आहे.