Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट

सुरक्षित स्थळावरून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवून लक्ष्यत स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हमास आणि इतर संघटनांनी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याच्या पद्धतीचा वापर केला जाणार होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 18, 2025 | 01:13 PM
Delhi Bomb Blast:

Delhi Bomb Blast:

Follow Us
Close
Follow Us:
  • ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट
  • दानिशला आज न्यायालयात हजर करणार
  • सीरिया, गाझासारखे हल्ले करण्याचे षडयंत्र
 

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, हमासच्या मॉड्यूलनुसार ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याने चौकशी दरम्यान दिली आहे. यामुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या आहेत. दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. ड्रोनवर कॅमेरा आणि बॅटरी असलेला एक बॉम्ब बसवण्याची तयारी सुरू होती, परंतु त्याला मूर्त रूप देण्यापूर्वीच हा कट उधळला गेला.

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

दानिशला आज न्यायालयात हजर करणार

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणान्या एनआयएला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आहे. दानिशला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली, दानिश हा जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी आहे आणि त्याने दहशतवादी उमर उन नबीसह हल्ला करण्याचा कट रचला होता. एनआयएचे पथक जसीर बिलाल वाणीसह दिल्लीत दाखल झाले आहे. त्याला मंगळवारी सकाळी पटियाला हाऊस येथील विशेष एन्नआयए न्यायालयात हजर केले जाईल.

सीरिया, गाझासारखे हल्ले करण्याचे षडयंत्र

सुरक्षित स्थळावरून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवून लक्ष्यत स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हमास आणि इतर संघटनांनी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याच्या पद्धतीचा वापर केला जाणार होता. सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानसारख्या भागात असे हल्ले करण्यात आले आहेत. त्या मॉड्यूलची नक्कल करून भारतात तसे हल्ले प्रयत्न केला जात होता. त्यानुसार अमोनिया नायट्रेट आणि इतर खतरनाक स्फोटकांचा त्यांनी गोळा केला होता. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

 मृतांची संख्या १५ वर

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार बॉम्ब स्फोटातील आणखी दोन जखमीचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. लुकमान (५०) आणि विनय पाठक (५०) अशी त्यांची नावे आहे. गेल्या गुरुवारी बिलाल नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या १३ झाली होती.

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral

दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral

दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये डॉक्टरी पेक्षा असलेल्या दहशतवाद्यांची नावे समोर आली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरचा (Jammu and Kashmir) रहिवासी असलेला दहशतवादी डॉ. उमर हा या हल्ल्लामध्ये गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, डॉ. उमर याचा दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

लाल किल्ला परिसरामधील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने हा आत्मघाती हल्ला केला. गाडीमध्ये सापडलेल्या त्याच्या पायाचा डीएनए देखील मॅच झाला आहे. यामुळे हा हल्ला त्यानेच घडवून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरुन त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ. उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर आला. यात उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.

Web Title: Delhi bomb blast shocking information revealed in delhi blast case according to hamas module there was a plot for a rocket attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Delhi blast
  • Terrorist Attack
  • viral video

संबंधित बातम्या

Bihar Woman Viral Video : घोर कलियुग! भर रस्त्यात महिलेवर बिहारमध्ये लैंगिक अत्याचार, Video Viral होताच केली कारवाई
1

Bihar Woman Viral Video : घोर कलियुग! भर रस्त्यात महिलेवर बिहारमध्ये लैंगिक अत्याचार, Video Viral होताच केली कारवाई

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…
2

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये  सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL
3

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
4

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.