Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘याची किंमत मोजावी लागेल’; ट्रुडोंचे माजी सहाय्यक जगमित सिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावाने सध्या कॅनडा आणि अमेरिकेत वाद सुरु आहे. दरम्यान, NDP चे नेते आणि जस्टिन ट्रुडोंचे माजी सहकारी जगमित सिंग यांनी देखील या प्रस्तावाला विरोध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2025 | 05:12 PM
Former Trudeau aide Jagmeet Singh warns Donald Trump there will be consequences

Former Trudeau aide Jagmeet Singh warns Donald Trump there will be consequences

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावाने सध्या कॅनडा आणि अमेरिकेत वाद सुरु आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. जस्टिन ट्रुडो आणि भारतीय वंशाच्या माजी खासदार अनिता आनंद यांनी ट्रम्प यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते की, कॅनडा हा स्वतंत्र्य देश आहे आणि अमेरिकेत विलिन होणे शक्य नाही.

 जगमीत सिंग यांचा देखील ट्रम्प यांना विरोध 

दरम्यान, न्यू डेमोक्रेटिक पार्टी (NDP) चे नेते आणि कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे माजी सहकारी जगमीत सिंग यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांना कॅनडच्या टॅरिफ वाढ आणि कॅनाडचा अमेरिका विलीनीकरणाच्या प्रस्तावांवर कडक शब्दांत तीव्र विरोध केला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या 47व्या अध्यक्षपदाची शपथविधी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, जगमीत सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कनॅडा बिकाऊ नाही, ना आता, ना कधीही भविष्यात.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तुर्की-पाकिस्तान-बांगलादेश युती; भारतासाठी नवा धोका? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

I have a message for Donald Trump. We’re good neighbours. But, if you pick a fight with Canada – there will be a price to pay. pic.twitter.com/o60c4qIyza — Jagmeet Singh (@theJagmeetSingh) January 12, 2025

आणखी काय म्हणाले जगमीत सिंग? 

जगमीत सिंग म्हणाले, “मी संपूर्ण देशभर फिरलो आहे आणि मला खात्री आहे की कॅनडाचे नागरिक आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगतात. आम्हाला आमच्या देशाची सार्वभौमत्व टिकवण्यासाठी लढण्याची पूर्ण तयारी आहे.” त्यांनी अमेरिकेतील जंगलातील आगीच्या संदर्भात नमूद केले की, “जेंव्हा अमेरिकेत भयावह जंगली आग लागली होती, तेंव्हा कॅनडाच्या अग्निशामकांनी पुढाकार घेत अमेरिकेला मदत केली. हे दाखवते की आम्ही कोण आहोत आणि आम्ही आपल्या शेजाऱ्यांचे कसे समर्थन करतो.”

जगमीत सिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, “जर त्यांना वाटते की ते कॅनडाशी संघर्ष करू शकतात, तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल.” त्यांनी पुढे म्हटले, “जर ट्रम्प यांनी 25 टक्क्यांनी टॅरिफ वाढवले, तर आम्ही देखील तेवढाच प्रतिउत्तरादाखल टॅरिफ लावू. कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नेत्यांनीही असाच ठाम दृष्टिकोन बाळगावा, असे माझे मत आहे.” जगमीत सिंग यांच्या या वक्तव्यामुळे ट्रम्प प्रशासनाला कॅनडाशी असलेल्या संबंधांवर विचार करावा लागेल. तसेच, त्यांनी दिलेली चेतावणी कॅनडाच्या सार्वभौमत्वासाठी कठोर भूमिका घेण्याचा इशारा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Kumbh Mela 2025: तुर्कीतील महिलेने घेतला महाकुंभात स्नान करण्याचा अनुभव; म्हणाल्या…

Web Title: Former trudeau aide jagmeet singh warns donald trump there will be consequences nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Canada
  • Donald Trump
  • Justin Trudeau
  • US
  • World news

संबंधित बातम्या

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
1

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 
2

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
3

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर
4

Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.