Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?

France Red Alert : युरोपच्या काही शहरांमध्ये जून महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये आपत्कालीन सेवांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. मद्यपान विक्री आणि मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 04:24 PM
France

France

Follow Us
Follow Us:
  • ओस पडलेले रस्ते, मद्यपानावर बंदी
  • G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ
  • नेमकं काय आहे प्रकरण?
France Heatwave Red Alert : पॅरिस : युरोपमध्ये पुन्हा तीव्र उष्णतेची लाट आली असून फ्रान्समध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. नुकतेच पार पडलेल्या G7 परिषदेनंतर फ्रान्सच्या तापमानात वाढ झाली असून देशाच्या अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Meloni Trump Controversy : ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर

आपत्कालीन सेवांना हाय अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. यामुळे जंगलातील आगीचा धोका वाढला असून फ्रेंच सरकारने आपत्कालीन सेवांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये जून महिन्यात सर्वोच्च तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमध्ये नेहमीपेक्षा हवामानाचा पार जास्त वाढला आहे. याशिवाय स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीतही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अनेक मैदानी क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपासन विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मद्यपानावरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे वैद्यकीय यंत्रणा उष्माघातग्रस्त नागरिकांवर लक्ष्य केंद्रित करु शकेल.

इतिहासाची पुनरावृत्ती

२००३ मध्ये फ्रान्समध्ये भीषण उष्णतेची लाट आली होती. अशाच लाटीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २००३ साली या उष्णतेने जवळपास १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामुळे यावेळी वृद्धाश्रम, नागरि वस्त्या, बेघर नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आदेश फ्रेंच सरकारने दिले आहेत.

पर्यटकांसाठी विशेष नियोजन

याशिवाय पर्यटनस्थळांवर नागरिकांना आणि पर्यटकांना दिलासा देण्यासाठी विशेष कूलिंग सिस्टम उभारण्यात आले आहे. फ्रान्समधील बहुतांश घरांमध्ये वातानुकूलन यंत्रणा नसल्याने गरमीपासून बचाव कठणी होतो. यामुळे वीजपुरवठा सुरक्षित राहावा यासाठी अणुउर्जा प्रकल्पांतील पाण्याच्या उपलब्धतेची काळजी घेतली जात आहे.

फ्रान्सच्या प्रसिद्ध म्युझिक डे उत्सावरही याचा परिणाम झाला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मद्यपान टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच शाळांनाही परिक्षा पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे. उष्णतेच्या वाढत्या संकटामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा : Trump on Hormuz : होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराण कराराबाबत ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितलं

Web Title: France heatwave red alert after g7 summit alcohol ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • France
  • heatwave
  • World news

संबंधित बातम्या

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना
1

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
2

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.