फोटो सौजन्य सोशल मीडिया
तो चक्क उल्कापिंडीपासून महागडे आणि आकर्षक चाकू तयार करतो . त्याच्या हाताने तयार केलेल्या एका चाकूची किंमत तब्बल ५ हजार ते ६ हजार युरो म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ५.३ ते ६.९ लाख रुपये आहे . या अनोख्या कलेमुळे हा जोरीस डोमारेस्ट सध्या चर्चेत आला आहे .त्याच्या चाकूच्या कलाकुसरीची भुरळ फ्रान्समधील लोकांवर पडत आहे .
फ्रान्समधील युरे ( Eure ) प्रांतात हा कारागीर जोरीस डोमारेस्ट आपल्या वेगळ्या कलेमुळे चर्चेत आला आहे . पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कापिंडामुळे आढळणाऱ्या धातूंचा वापर करून तो चाकू तयार करतो . उल्कापिंडामध्ये प्रामुख्याने लोखंड आणि निकेलसारखे धातू आढळतात . या धातूंना योग्य पद्धतीने आकार देऊन त्याहून आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण चाकू तयार केले जातात . प्रत्येक उल्कापिंडाची रचना वेगळी असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या वास्तुंनाही एक वेगळे स्वरूप मिळते .
Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
जोरीस डोमारेस्ट ने तयार केलेल्या चाकूंची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे . एका चाकूची किंमत ५ ते ६ हजार युरो म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ५.३ ते ६.९ लाख रुपये आहे . एवढी मोठी किंमत असतानाही अशा वस्तुंना विशेष संग्राहक आणि दुर्मिळ वस्तूंची आवड असलेल्या ग्राहकांकडून मागणी मिळते . या चाकूंचे वैशिष्ठ केवळ त्यांचा वापर नसून त्यामागे असलेला अवकाशाचा इतिहास आणि कारागिरांचे कौशल्य आहे .
त्यामुळे या वस्तू शौकीन तसेच कलाकाराची किंमत किंवा कलाकाराच्या कलेचा आदर म्हणून अशा वस्तू खरेदी केल्या जातात . त्याचबरोबर बदलणाऱ्या माणसाच्या विचारांमुळे अशा महागड्या आणि दुर्मिळ वस्तूचे मालक असणे हे श्रीमंत असल्याचे सामाजिक प्रतीक म्हणून सुद्धा खरेदी केले जाते .
Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
उल्कापिंडापासून वस्तू तयार करणे हे सामान्य लोहारकामापेक्षा अधिक आव्हानात्मक मानले जाते . धातूची रचना , त्याचे तापमान आणि घडणावळीची प्रक्रिया यांचा विशेष अभ्यास करावा लागतो . योग्य तंत्राचा वापर करूनच त्याला अपेक्षित आकार देता येतो . विशेष म्हणजे उल्कापिंडामधील नैसर्गिक धातूंच्या रचनेमुळे तयार वस्तूंवर वेगळी नक्षी आणि पोत दिसू शकतो . त्यामुळे चाकूला स्वतंत्र ओळख मिळते . विज्ञान , इतिहास आणि पारंपरिक कामगिरी यांचा संगम असलेली ही कला फ्रान्समध्ये लक्ष वेधून घेत आहे .






