Raj Thackeray : आमची सह्याद्री पोखरणार का?’ राज ठाकरेंचा सरकारला सवाल, सौजन्य : सोशल मीडिया
Raj Thackeray :बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतच्या सोय डोंगरावर जाऊन तोंडलेल्या झाडांची पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी ‘सह्याद्री जागा हो’ अशी टॅगलाईन घेऊन एक सभा घेत केंद्रासह राज्यसरकारवर प्रश्नांचा भडीमार केला.
आज जंगलतोड झाली तिथे मी गेलो होतो, तोडलेली लाकडं रचून ठेवली होती. ते बघताना मला वाटलं जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे. इतक्या वर्षांची जुनी झाडं, कोणत्या तरी गुजरात्यासाठी म्हणून कापून टाकत आहेत. मला सांगा या प्रकल्पाची गरज काय आहे? या सगळ्या गोष्टींच्या मागचं षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, यांना केंद्रात जे दोघं बसलेत यांच्याकडून शून्य किंमत आहे, असेही राज ठाकरे कर्जतच्या सभेत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आम्ही जे सांगू ते महाराष्ट्रात झालं पाहिजे. हा जमिनीचा तुकडा, जंगलाचा तुकडा आम्ही सांगतो, त्याला देऊन टाका. हे सगळं वरती ठरतं. मी विभानसभेच्या वेळी पुन्हा सांगत होतो, महाराष्ट्र जर यांच्या हाती गेला, तर दोन माणसांच्या हाती महाराष्ट्र जाईल आणि ते वाट्टेल ते करतील.
सरकारचं असं वागण्यास कारणीभूत निवडणुकीच्या तोंडावर आत्तापर्यंत कुणाला मतदान केलं, कुणाला निवडून दिलं, यात लपलं आहे. 30 ते 35 टक्के जनता आणि बाकी निवडणूक आयोग आहेच. मातचा-भगिनींना 1500 रुपये लाडकी बहिण योजना, अशा योजनेतून तुम्हाला विकत घेतलं जातं आहे आणि तुमची तोंड बंद केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रात सत्तेत बसलेले लोक आहेत. त्यांच्या हातात काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचं निवेदन मी त्यादिवशी ऐकलं. त्यांनीच सांगितलं की, केंद्राने ठरवलं आणि खासगी कंपनीने ठरवलं आणि मग हा प्रस्ताव आम्हाला दिले हे त्यांनीच सांगितलं. मी तुम्हाला म्हणालो तसं हे सगळं वरती ठरतं. उद्योगपती मोदी आणि शहा यांना भेटतात आणि सांगतात की, आम्ही जमीन पाहिली आहे. आम्हाला प्रकल्प उभारायचा आहे. मग वरून खाली फोन येतात. मग पोलिसांसारखं वागायचं. सिनीयर आली की सॅल्युट करतात. सत्तेची भीती, पदाची भीती वाटते म्हणून हे पण तसंच वागतात.
ते पुढे म्हणाले की, गप्प राहणारा, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा महाराष्ट्र का? गुजरातचे दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार का? आमची सह्याद्री पोखरणार का? आणि आम्ही हतबल झालो आहोत. आज गावातल्या महिला मला येऊन भेटल्या. हातात लेकरू होतं त्यांच्या, जंगल वाचवा म्हणत होत्या. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? मग तुमचे कोयते काय करतात? कोयते काय फक्त फांद्या छाटायला आहे का? असा प्रश्नही त्यांनी ग्रामस्थांना केला.
कर्जतमध्ये आलेला प्रकल्प काही टेंडर निघालं नाही. ही महाराष्ट्रातील यादी वाचून दाखवतो, एकूण 23 प्रकल्प येत आहे. त्यातील काही प्रकल्प हे बाहेरचे आहे. यातील 3 प्रकल्प हे फक्त केंद्रातले असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की,
अदानी हायड्रो, रिव्ह हायड्रो, मेगा इंजनियअरिंग, अदानीचे 3 प्रकल्प, जेएसडब्यू, अदानी, टोरंट, रिंको हे सगळे खासगी प्रकल्प आहे. असे 23 प्रकल्प आहे, 236 प्रकल्प येत आहे. हे सगळं चालू आहे, महाराष्ट्रामध्ये टेडा सेंटर येणार आहे, त्यासाठी विज लागणार आहे. या प्रकल्पाच्या बाजूला शहरं बसणार आहे, त्यांना विज लागणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कोळश्यावर चालणारी 40 प्रकल्प येत आहे. माझा प्रश्न असा की, 40 आणि हे 23 प्रकल्प कुणासाठी आणत आहात, नीट जर पाहिलं तर तुमचे मतदारसंघ फोडत असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला.






