France President Emmanuel Macron's wax statue stolen from Paris museum
पॅरिस: एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. सोमवारी (२ जून) पॅरिसमधून एका प्रसिद्ध मेणाच्या संग्रहालातून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचा मेणाचा पुतळा चोरीला गेला आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमागे पर्यावरण संघटना ग्रीनपीसचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना कानशीलात बजावली होती.
या घटनेनंतर आता अध्यक्ष मॅक्रॉन यांचा मेणाचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मॅक्रॉनयांचा हा मेणाचा पुतळा २०१८ मध्ये ग्रीविन संग्रहालयात स्थापित करण्यात आला होता. फ्रान्सच्या या ऐतिहासिक संग्रहालयात मॅक्रॉन यांचा पुतळा एक राजकीय आकर्षण ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोन महिला आणि एका पुरुषाने पर्यटकांच्या रुपात संग्रहालयात प्रवेश केला आणि संधी मिळताच आपत्कालीन मार्गाने पुतळा बाहेर नेला.
मीडिया रिपोर्टनुसार, ग्रीनपीसच्या कार्यकर्त्यांनी ग्रीविन संग्रहालयातील राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा मेमाचा पुतळा चोरला आणि त्यानंतर पॅरिसमधील रशियन दूतावासासमोर निषेधार्थ ठेवला. यामागचे कारण सध्या रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. असे असताना फ्रान्सचा रशियाशी व्यापार सुरुच आहे. यामुळे रशियाशी असलेल्या व्यापारसंबंधाच्या निषेधार्थ असे कृत्य करण्यात आले.
ग्रीनपीसचे प्रमुख जीनफ्रॅंकोइस ज्युलियर्ड यांनी, फ्रान्स दुहेरी खेळ खेळत असल्याचे म्हटले. इमॅन्युएल मॅक्रॉन हे दुटप्पी आहेत एकीकडे त्यांनी रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे, तर दुसरीकडे रशियासोबत व्यापर सुरुच आहे.
ज्युलियर्ड यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर एक विशेष जबाबदारी आहे. त्यांनी रशियासोबतचे व्यापार थांबवावा. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फ्रान्स हा युक्रेनचा समर्थक राहिला आहे. तसेच युरोपच्या सामान्य भूमिकेला मजबूत बनवण्यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळ हे लक्षात घेऊन रशियासोबत फ्रान्सने व्यापर बंद करायला हवा.
रशिया युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. जागतिक स्तरावर रशिया-युक्रेनमध्ये युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहे. पण प्रत्येक वेळी हे प्रयत्न अपयशी होताना दिसत आहेत. नुकतेच युक्रेनने रशियाच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. फम यामुळे हे युद्ध अजून चिघळण्याची शक्यता आहे.