Gaza father buys Parle-G in war zone for daughter which cost Rs 2,347
सध्या गाझामध्ये इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांमुळे तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गाझातील लोकांना पायाभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. इस्रायलने गाझाला मिळणार अन्न-धान्य पुरवठ्याची मानतावादी मदतही बंद केली आहे. यामुळे लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडत आहे. शिवाय अमेरिकेच्या निधीतून पोहचवल्या जाणाऱ्या मदत वाटपादरम्यानही इस्रायली सैनिकांच्या गोळीबारामुळे चेंगराचेंगरी होऊन लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच अन्न-धान्याचेही नुकसान होत आहे. इस्रायलने सर्व मदत बंद केल्याने लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. एवढेच नव्हे तर तिथे काही वस्तूंच्या किमती तिप्पटीने वाढल्या आहेत.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक वडील आपल्या लेकीसाठी बिस्कीटचा पुडा घेऊन आहे आहेत. व्हिडिओ कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात पाच रुपयाला मिळणारा हा बिस्कीट पुडा, विदेशात १०० रुपयांला मिळतो. तर या बिकस्टांच्या १२ पुड्यांचे पाकिट गाझामध्ये २३५० रुपयांना मिळत आहे. मोहम्मद जवाद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा बिस्कीट पुडा त्याच्या लेकीला आवडतो यामुळे आणला असल्याचे म्हटले. हा पुडा आधी गाझामध्ये १.५ युरोला मिळत होता. आता बिस्कीट पुडा २४ युरोला मिळतो असे मोहम्मदने म्हटले आहे. यापुड्यासाठी त्याच्या मुलीला खूप दिवस वाट पाहावी लागल्याचे त्याने म्हटले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
After a long wait, I finally got Ravif her favorite biscuits today. Even though the price jumped from €1.5 to over €24, I just couldn’t deny Rafif her favorite treat. pic.twitter.com/O1dbfWHVTF
— Mohammed jawad 🇵🇸 (@Mo7ammed_jawad6) June 1, 2025
सध्या गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. इस्रायलच्या मानतावादी मदत बंद करण्याने गाझातील लोकांचे अत्यंत वाईट हाल होत आहेत. अशातच गाझाच्या राफा शहरात अमेरिकेच्या मदतीने एक मतद केंद्र चालवले जात आहे. हे मदत केंद्र लोकांसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम करत आहे. यावर इस्रायलचे नियंत्रण आहे. परंतु अन्नवाटपावेळी इस्रायली सैन्याने दोन वेळा गोळीबार केला आहे.
इस्रायलने १ जून रोजी केलेल्या गोळीबारामुळे लोक भीतीने पलून लागले, यामुळे चेंगराचेंगरी होऊन ३० जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी पॅलेस्टिनी जखमी झाले. यामध्ये विशेष करुन लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. त्यापूर्वीही इस्रायलने २९ मे रोजी अन्न वाटपादरम्यान गोळीबार केला होता. जागतिक स्तरावर इस्रायलच्या या कृतीला जाणूनबुजून केलेला हत्याकांड म्हणून संबोधले जात आहे.